राजुभाई  सुलेमान पठाण यांची राष्ट्रवादी युवक च्या गंगापूर तालुकाध्यक्ष पदी निवड

तालुक्यातील अमळनेर येथील कार्यकर्ते राजुभाई  सुलेमान पठाण यांची राष्ट्रवादी युवक च्या गंगापूर तालुकाध्यक्ष पदी निवड राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश भाऊ  चव्हाण यांनी रविवारी 23 एप्रिल रोजी नियुक्तीपत्र देऊन केली.

तालुक्यातील ढोरेगाव येथे राष्ट्रवादी चे युवा नेते अल्ताफ  पटेल यांच्या निवासस्थानी रमजान ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी चे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी 
राजुभाई सुलेमान पठाण यांची  राष्ट्रवादी युवक च्या गंगापूर तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्ती पत्र दिले. तसेच माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, राष्ट्रवादीचे गंगापूर तालुकाध्यक्ष  डॉ. ज्ञानेश्वर नीळ, माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी राजुभाई पठाण यांना पक्ष वाढीसाठी व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

या प्रसंगी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आयुब पटेल, खलील पटेल, माजी उपसरपंच मुस्ताक पटेल, युवा नेते अल्ताफ पटेल, सुधीर माने,शिवाजी मिसाळ,सुनील बोराटे, रफिक सय्यद, सोमनाथ पठाडे, मोबीन शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!