पिस्तूलचा धाक दाखवत कापसाच्या व्यापाऱ्याला  27 लाख 50 हजार रुपयाला लुटले

कारला मोटरसायकल आठवी लावुन मारहाण करत पिस्तूलचा धाक दाखवत कापसाच्या व्यापाऱ्याला  27 लाख 50 हजार रुपयाला लुटल्यामुळे व्यापा-यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे

औरंगाबादकडून लासुर स्टेशनकडे जाणाऱ्या एका कापसाच्या व्यापाऱ्याच्या कार समोर दुचाकी आडवी लावून दोन जणांनी दगडफेक करून कार थांबवली. व पिस्तूलचा धाक दाखवत लाठ्याकाठ्यांनी कारच्या समोरील काचा फोडल्या आणि 27 लाख 50 हजार रुपयाची रक्कम असलेली बॅग लंपास केली. सिनेस्टाईल पद्धतीने घडलेली ही घटना वाळूज औद्योगिक परिसरातील करोडीच्या उड्डाण पूलाजवळ सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
 सुत्रांकडून मिळालेली माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील देवळी येथील रहिवासी साईनाथ मनोहर तायडे हे कापसाचे व्यापारी आहे. ते शेतकऱ्यांना कापसाचे पैसे देण्यासाठी कार क्रमांक एम एच 20, सीएस -3915 मधून चालक अनिल भुसारे यांच्यासह गेले होते. शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर उर्वरित रक्कम घेऊन तायडे हे देवळी येथे राहत्या घरी औरंगाबादकडून लासुर स्टेशनकडे जात असताना त्यांची कार  वाळूज औद्योगिक परिसरातील सोलापूर धुळे रोडवरील करोडीच्या उड्डाणपूला जवळ येताच समोरून अज्ञात चोरट्यांनी एकलाल रंगाची दुचाकी आडवी लावली असता चालकाने कार थांबवताच पाठीमागून एक जण धावत आला. त्यांनी कारवर दगडफेक केली व  चालक अनिल भुसारे याच्या कानाला पिस्तूल लावून लाठ्या काठ्याने कारवर हल्ला करून काचा फोडल्या. त्यामुळे घाबरलेले साईनाथ तायडे हे खाली उतरत असतानाच अज्ञात आरोपींनी त्यांच्या कारमधील 27 लाख 50 हजार रुपयाची रक्कम असलेली बॅग घेऊन पळ काढला. ही घटना सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.  सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यात साईनाथ तायडे यांच्या हातावर काठी लागल्याने ते जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिरे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद सलगर, पोलीस निरीक्षक अपर्णा गीते, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, सचिन वायाळ, पोहेकॉ. राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, सुरज अग्रवाल, आयुब पठाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. या हल्ल्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात साईनाथ तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला
उड्डाणपूल बनले चोरांचे अड्डे –
सोलापूर धुळे रोड वाहनधारकांसाठी सुखकर असला तरी या रोडवर अनेक उड्डाणपूल चोरट्यांचे अड्डे बनले आहेत. त्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील ए एस क्लब, तिसगाव आणि करोडी या उड्डाणपूलाचा चोरांच्या अड्ड्यात समावेश आहे. या ठिकाणी अनेक वेळा लूटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. रात्री दहा नंतर पहाटे चार पर्यंत येथे चोरांचे साम्राज्य असते. येथे झालेल्या लुट मारीबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनेक जणांच्या तक्रारी दाखल आहेत. मात्र पोलिसांकडून रात्री येथे कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नसतो. त्यामुळे लूटमारीच्या प्रकारात वाढत होत असल्याचेही वाहनधारक व प्रवाशांमधून बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!