गंगापूरमध्ये अज्ञात दोन चोरट्यांनी तीन दुकाने फोडून पासष्ट हजारांचा ऐवज लंपास केला चोरटे सीसीटीव्हीत कैद..

गंगापूरमध्ये अज्ञात दोन चोरट्यांनी तीन दुकाने फोडून पासष्ट हजारांचा ऐवज लंपास केला चोरटे सीसीटीव्हीत कैद..


गंगापूर (प्रतिनिधी) मेडिकल , पानटपरी व कापड  दुकानाचे शटर उचकटत चोरट्यांनी दुकानातील रोकड सह ६० ते ६५ हजार रुपयांचा ऐवज  लंपास केल्याची घटना (आज पहाटे) २३ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता समोर आली.  दुकानाबाहेरील सीसीटीव्हीत दोन चोरटे कैद झाले आहेत.
विशेष म्हणजे शहराच्या मुख्य चौकात धाडसी चोरी झाल्याने पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्न उपस्तीत केले जात आहे.
गंगापूर शहरातील मुख्यबाजार पेठ असलेली शिवाजी महाराज चौकातील यासीन शहा यांची पानटपरीमधुन शिगारेट पाकीट व कृष्णा सुंब यांचे साईसमर्थ लेडीज वेअर व कापड दुकानात पहाटे तीन वाजता शटरचे कुलुप तोडून कांउटरच्या गल्ल्यातील रोख ६० हजार रुपये व राजीव गांधी चौक येथील पवार यांचे मेडिकलचे चोरट्यांनी शटर उचकटत गल्ल्यातील रोकड, दुकानातील इतर साहित्य लंपास केले आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दुकान मालक सुंब व पवार यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासली असता त्या मध्ये दोन चोरटे चोरी करीत असताना कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी सुंब यांनी तक्रार अर्ज दिला होता रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!