गंगापूर पोलीसांनी रोडराॅबरी करणा-या दोघांच्या चोवीस तासांत मुसक्या आवळल्या तर मोटारसायकल चोराला ठोकल्या बेड्या.

गंगापूर(प्रतिनिधी) गंगापूर पोलिसांची कारवाई.परप्रांतिय कामगाराला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने लुटणाऱ्या दोघांच्या चोवीस तासात मुसक्या आवळून गजाआड केले तर मोटरसायकल चोरट्यास शिताफिने केले जेरबंद.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार १८ जानेवारी रोजी दिनेश रुमसिंग कश्यप वय ३४ वर्षे रा. पिपलीया गई, ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ह.मु. भिवधानोरा ता. गंगापुर यांनी भिवधानोरा येथिल आठवडा बाजारात जाऊन सायंकाळी ०६:३० वाजता मालकाकडून त्यांच्या पगाराचे २० हजार रुपये घेऊन बाजार करून रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास बाजार करून शेतवस्तीवर परत जात असतांना भिवधानोरा गावाचे अलिकडे दोन व्यक्ती या भरधाव वेगाने मोटारसायकलवर आले व हाताला धरून बळजबरीने ओढत शेतात नेले, बराच आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी देवुन बाजार करून उरलेले खिशातील १५ हजार रूपये रोख व मोबाईल फोन असा एकुण २६ हजार रुपये किंमतीचा माल बळजबरीने चोरून नेल्या प्रकरणी गंगापुर पोलिस स्टेशनमध्ये १९ जानेवारी रोजी कलम ३९४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, यांच्या सुचनेनुसार वरील गुन्हयाचा तपास पोनि सत्यजीत ताईतवाले हे करिता असतांना त्यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि हा गुन्हा भिवधानोरा व पखोरा येथील दोन व्यक्तींनी केला आहे. यावरुन गंगापुर पोलीसांची दोन वेगवेगळी पथके तयार करून पो. नि. ताईतवाले यांचे पथकांने पखोरा येथील शेतवस्तीवर संशयीत ईसमाचा शोध घेतला असता तो एका पडित गायरान जमिनीतील झाडाचे आडोशाला लपुन बसला होता. पोलीसांनी शेताच्या परिसरात सापळा लावून अत्यंत शिताफिने हालचाल न होवु देता आरोपी हा गाफिल असतांना त्याचेवर अचानक झडप घालून त्याला ताब्यात घेतले यावेळी त्याला त्याचे नांव गाव विचारता त्यांने त्याचे नाव सागर अशोक जाधव वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर असे सांगितले यावेळी त्याला गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता तो पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे देवुन लागल्याने त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार रामेश्वर बाळासाहेब चव्हाण यांचे सोबतीने केल्याचे कबुल केले. यावरून पोउपनि प्रमोद काळे, यांचे पथकांने मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवधानोरा येथील स्मशान भुमीच्या परिसरात लपुन बसलेल्या दुसरा आरोपीच्या अत्यंत शिताफिने मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. त्यांचे ताब्यातुन गुन्हयातील तिन हजार रुपये रोख व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व नमुद गुन्ह्यातील आरोपी सागर अशोक जाधव वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापुर व रामेश्वर बाळासाहेब चव्हाण वय ३० वर्षे रा. भिवधानोरा यांना अटक करण्यात आली आहे.
मोटारसायकल चोर पकडला
दुसऱ्या प्रकरणी पोनि, सत्यजीत ताईतवाले हे पखोरा येथील आरोपीला पो.स्टे. गंगापुर येथे घेवुन जात असतांना मोटरसायकल वरिल एक ईसम हा पोलीसांना बघुन अत्यंत भरधाव वेगात सुसाट निघाला यावेळी त्याचेवर संशय बळावल्याने त्याचा एक किलोमीटर पाठलाग करून त्यास पखोरा येथील पारधी वस्तीजवळ थांबवून विचारपुस केली असता तो पोलीसांना घाबरुन उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याची कसोशिने विचारपुस केली तेव्हा त्यांने त्याचे नाव सुरेश वाल्मिक घाणे वय २५ वर्षे रा. शहापुर घोडेगाव असे सांगुन तो चालवित असलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस काळया रंगाची क्रमांक एम. एच. २० डी.पी. ७४०४ ही त्याने बकलवालनगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथुन दिनांक ५/५/२०२० रोजी चोरी केल्याचे कबुल केले आहे. यावरून गंगापूर पोलीसांचे सतर्कतेमुळे पो.स्टे. वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथील गुरनं १०७/२०२० कलम ३७९ भादंवी हा सुध्दा उघडकीस आणला असुन गुन्हयातील चोरी गेलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस क्रमांक एम.एच. २० डी.पी. ७४०४ ही जप्त करून आरोपी सुरेश वाल्मिक घाणे वय २७ वर्षे रा. शहापुर घोडेगाव यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी . जयदत्त भवर गंगापुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पो.उप.नि. प्रमोद काळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, राहुल वडमारे, संदीप गायकवाड, अजित नागलोद यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!