नगर परिषदेने आठ महिन्यांचे वेतन नाही दिल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा हुसेन बुढाण शेख यांनी दिला.

गंगापूर (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या आग्निशमन गाडीवरील चालकांचेआठ महीने थकीत असलेले वेतन प्रजासत्ताक दिनापर्यंत न दिल्यास प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
गंगापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आग्निशमन गाडीवर चा्लक असलेले हुसेन बुढाण शेख हे कर्तव्य बजावत असुन नगरपरिषदेच्याआग्निशमन गाडीवर २४ तास सेवा बजावत आहेत मागील आठ (८) महिण्यापासून वेतन (पगार) रक्कम रूपये १,लाख २२ हजार,५००/- मिळालेले नाही मुख्याधिकारी यांनी मला आठ महिण्याचे वेतन (पगार) दयावा नाहीतर मी तो पर्यंत आग्निशमन गाडी चालविणार नाही, तसेच सदर कामाचे वेतन मिळाले नसल्यामुळे माझ्यावर व माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली असून माझी उपजिवीका या कामावरच अवलंबुन असुन तरी मे. साहेबांनी माझे वेतन ५००/- रूपये हजेरीप्रमाणे देण्यात यावे नसता मी आपल्या कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनी २६/०१/२०२४ रोजी आत्मदहन करणार असून याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!