आमदार प्रशांत बंब यांच्या स्थानिक विकास निधी मधुन दहा संगणक व प्रिंटर गंगापूर तहसीलसह ईतर कार्यालयात देण्यात आले

गंगापूर (प्रतिनिधी) शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे खोळंबू नये यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी त्यांच्या स्थानिक निधीतून दहा लाख रुपयांची दहा संगणक व प्रिंटर तहसीलसह ईतर कार्यालयात दिल्याने कामाला गती मिळाली आहे.
तहसील व पोलिस स्टेशनमध्ये कामाची व्याप्ती बघता आमदार प्रशांत बंब यांनी स्थानिक विकास निधी कार्यक्रम सन-२०२३-२४ मध्ये मतदार संघातील गंगापूर तहसिल कार्यालयात सात लाखांचे सात संगणक व सात प्रिंटर.
पोलीस स्टेशन गंगापूर अंतर्गत होमगार्ड कार्यालयास एक संगणक व एक प्रिंटर देण्यात आले तसेच पोलीस स्टेशन खुलताबाद येथे एक संगणक व एक प्रिंटर, देवळाणा, जि.प. शाळा येथे एक संगणक व एक प्रिंटर दिले. गंगापूर तहसील कार्यालयात संगणक देताना नायबतहसीलदार खैरनार अव्वल कारकून संदीप वाडीकर, आमदार बंब यांचे सचीव कृष्णकांत व्यवहारे सचीव प्रशांत मुळे, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष अतुल रासकर, महेश धुमाळ आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!