रोहयोच्या कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांना सुरू ठेवण्यात यावे -रवी चव्हाण


गंगापूर (प्रतिनिधी) दुष्काळी परिस्थिती असल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रोहयोच्या कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांना सुरू ठेवण्यात यावे -रवी चव्हाण
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळी व दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपल्याकडूनच घोषित झालेली आहे. विशेष बाब म्हणजे सध्या आपण दुष्काळी व दुष्काळी परिस्थिती दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केल्यानुसार जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाणी टँकर देखील सुरू करण्यात आलेले आहेत व अनेक गावांचे पाणी टँकरचे प्रस्ताव तहसील व पंचायत समिती कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर हवालदिल झालेले असताना आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना एकमेव साधन असलेले रोहयो अंतर्गत सुरू असलेले कामे थांबविणे बाबत आपण दिलेल्या तोंडी आदेशानुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व सरपंच व ग्रामसेवकांना लेखी स्वरूपात रोहयोची कामे थांबविणे बाबत लेखी पत्र काढले आहे. यात विशेष म्हणजे आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कार्यारंभ आदेश देण्यात आलेली कामे देखील सुरू करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे 14 ऑक्टोंबर 2016 च्या प्राधिकृत प्रकाशनातील भाग चार मधील मुद्दा क्रमांक दोन नुसार “दुष्काळ, पाणीटंचाई, इतर नैसर्गिक आपत्ती,गंभीररीत्या आजारी असलेल्यांना मदत करणे व सुरू असलेल्या योजना पुढे चालू ठेवता येतील. आचारसंहिता असल्याने एखाद्या ठिकाणी दुष्काळ असेल अथवा पाणीटंचाई असेल तर ती दूर करण्याबाबत कार्यवाही करू नये असा आचारसंहितेचा अर्थ होत नाही. त्यामुळे दुष्काळ, पाणीटंचाई व नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी कामे करण्यास बंदी असणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
तसेच संदर्भ क्रमांक दोन नुसार दुष्काळ व दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या भागात आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत हाती घ्यावयाच्या तातडीच्या उपयोजना बाबत महसूल व वन विभागाच्या शासन परिपत्रक 22 मार्च 2019 नुसार स्पष्ट करण्यात आलेले आहे. दुष्काळ किंवा दुष्काळ सदृश्य भागामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीसाठी हाती घेतलेले कामे पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मागणी किंवा गरज विचारात घेऊन नवीन कामे देखील घेता येतील. असे स्पष्ट निर्देशित केलेले असताना आपण आदर्श आचारसंहिता लागणेपूर्वी कार्यारंभ आदेश झालेली कामे देखील थांबवण्याचे आदेश दिलेले आहे जे की दुष्काळ व दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व मजुरांच्या मुळावर उठले आहेत.
आपल्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये संदर्भ क्रमांक तीन नुसार दुष्काळ व दुष्काळ सदृश परिस्थिती आपणच दि.15 मार्च 2024 च्या आदेशानुसार घोषित केलेले आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोहयो ची कामे सुरू करण्यास किंवा चालू ठेवण्यास आदर्श आचारसंहितेचा कुठलाही अडथळा येत नाही.
आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर यांची एकमेव आशा असलेली रोहयोअंतर्गत येणारी कामे थांबविल्यामुळे अजूनच भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जर कार्यारंभ आदेश झालेली विहीर,गाय गोठा, शेततळे किंवा रोहयो अंतर्गत येणारी सर्वच कामे जर आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली थांबली तर शेतकऱ्यांचं पुढील पूर्ण वर्ष वाया जाणार आहे. कार्यारंभ आदेश झालेल्या विहिरींची कामे जर थांबली तर दुष्काळी परिस्थितीत मजुरांना रोजगार मिळणार नाही, तसेच संबंधित शेतकऱ्याला पुढील वर्षी त्या विहिरीतील पाण्याचा त्याच्या शेतीसाठी वापर करता येणार नाही. ज्यामुळे मजूर शेतकरी व पर्यायाने राज्य व देशाचे देखील नुकसान आहे.
त्यासाठी संदर्भातील तिन्ही मुद्द्यानुसार दुष्काळी व दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये रोहयोची कामे चालू ठेवण्यास आदर्श आचारसंहितेचा कुठेही अडथळा निर्माण होत नाही. तत्काळ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू होण्याअगोदर जे कार्यारंभ आदेश देण्यात आलेली आहे ती व रोहयो अंतर्गत दुष्काळ निवारणाच्या दृष्टिने आवश्यक असलेली कामे सुरू करण्याचे आदेश द्यावेत व जी कामे आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली थांबविण्यात आली ती देखील सुरू करण्याबाबतचे आदेश द्यावेत ही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी व मजुरांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे .

१)राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर मादाम कामा रोड मुंबई यांचे दिनांक 14 ऑक्टोबर 2016 रोजी चे प्राधिकृत प्रकाशन मधील भाग चार अंतर्गत मुद्दा क्रमांक दोन अन्वये
2.दुष्काळ व दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या भागात आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत हाती घ्यावयाच्या तातडीच्या उपयोजना बाबत महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांचे दि.22.03.2019 रोजीचे परिपत्रक क्रमांक एस.सी.वाय- 2019 /प्र क्र.126/म.7 मार्च 2019.

3. मा.जिल्हाधिकारी,छत्रपती संभाजीनगर यांचे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दुष्काळी व दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केल्याचे दि.15 मार्च 2024 रोजी चे सुधारित आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!