पोलीसांच्या नावाला काळीमा.पत्नीशी अनैतिक संबंधातून निलंबित पोलिस अंमलदाराने मित्राच्या साह्याने लघुउद्योजक सचिन नरोडेचा केला खुन. निलंबीत पोलीस अंमलदार व त्याचा साथीदार गुन्हे शाखेकडून जेरबंद

गंगापूर (प्रतिनिधी) लघुउद्योजक सचिन नरोडेचा निलंबित पोलिस अंमलदाराच्या पत्नीशी अनैतिक संबंधातून पोलिस अंमलदाराने मित्राच्या साह्याने डोक्यात गोळी घालून खुन करणा-या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील साजापुर शिवारात गोळीबार करून सचिन साहेबराव नरोडे (३७) याचा खून अनैतिक संबंधाच्या कारणावरुन करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा निलंबित पोलीस अंमलदार रामेश्वर सिताराम काळे व त्याचा साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप यांनी मिळुन केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी २२ मार्च रोजी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली.

पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार वाळुज औद्योगिक परिसरातील बालाजीनगर, साजापुर ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे १७ मार्च रोजी रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने सचिन साहेबराव नरोडे, वय ३७ वर्ष याच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडुन त्याचा खुन केला.
याप्रकरणी सचिनचे वडील सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव फकीरराव नरोडे, वय ६७ वर्ष, यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात १८ मार्च रोजी कलम ३०२ भादंवी सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्यंत गंभीर व संवेदनशिल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार करीत होते. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेचे पाच वेगवेगळे पथक तयार करुन तपास कामी सूचना दिल्या होत्या.त्यानुसार मयत सचिन नरोडे याची कौटुंबिक व व्यावसायिक माहिती घेऊन गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये सचिन नरोडे याचा खून आरोपी रामेश्वर काळे यांच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरुन झाल्याचे उघड झाले. हा खून आरोपी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा निलंबित पोलीस अंमलदार रामेश्वर सिताराम काळे वय (३५) वर्ष, रा. लाडगाव रोड, तालुका वैजापूर व त्याचा साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप वय (२४) वर्ष, रा. भग्गाव तालुका वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मिळुन केला असून आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे.हा अतिसंवेदनशिल व गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे, प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, विनायक शेळके, काशीनाथ महांडुळे, पोलीस उप निरीक्षक विशाल बोडखे, प्रविण वाघ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!