कणकुरी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांसह विस ब्रास वाळू जप्त….ग्रामस्थांचा वाहने नेण्यास विरोध… काही काळ तणावाचे वातावरण..

कणकुरी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांसह विस ब्रास वाळू जप्त.
ग्रामस्थांचा वाहने नेण्यास विरोध ,काही काळ तणावाचे वातावरण


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथील नारळी नदी पात्रातून अवैध वाळू ऊत्खणन करून वाहतूक करत असलेल्या तीन ट्रक्टर वाळूसह एक जेसीबी 20 ब्रास वाळुचा पंचनामा करून महसूलच्या पथकाने वाहने जप्त करून सर्व वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहे.दरम्यान या पथकास विरोध दर्शवल्याने पथकाने पोलीसांना कळविले असता तात्काळ शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे जमादार आपसनवाड, कॉन्स्टेबल थोरे आदींनी कनकोरी येथे नदीपात्रात दाखल झाले.


गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथे नारळी नदी पात्रातून अवैध वाळू ऊत्खणन करून वाहतूक करत असल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांना मिळाली असता तहसीलदार यांनी तात्काळ महसुलचे पथक पोलीस फौजफाट्यासह कनकोरी येथील नदी पात्रात दाखल झाले यावेळी या पथकास तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी अवैध वाळू ऊत्खणन करून वाहतूक करत असल्याचे आढळून आले प्रथम या पथकास वाळू वाहतूक करणाऱ्यांनी विरोध दर्शवला मात्र पथकाने अवैध वाळू वाहतुक करणाऱ्याना न जुमानता अवैध वाळू ऊत्खणन करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर वाळूसह एक जेसीबी जप्त केले तसेच जायमोक्यावर 20 ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आला महसूल पथकाने वाहनासह अवैध वाळु साठ्याचा पंचनामा करून तहसील कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. या पथकात तलाठी संजय राठोड,
कैलास वणे, सुमोहन नजन,मेजर बिडवे, कोतवाल बाबुराव खंडागळे,पोलीस पाटील लक्ष्मण जानराव,चालक ताहेर शहा यांचा समावेश होता. दरम्यान ग्रामस्थांसह महीलांनी अवैध वाळू वाहतूक करणारे सर्व वाहने सोडून द्या म्हणून तहसील कार्यालयात जवळपास तीन तास ठीय्या देत निवडणूक विभागाच्या प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार विशाखा बलकवडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!