गंगापूरात बावनकुळे यांना पत्रकारांचे चहापानासाठी निमंत्रण

गंगापूरात बावनकुळे यांना पत्रकारांचे चहापानासाठी निमंत्रण


गंगापूर (प्रतिनिधी)अहमदनगर येथे व्हायरल रेकॉर्डिंग प्रकरणी गंगापूरात बहुउद्देशीय पत्रकार संघ जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना चहापानाचे निमंत्रण भाजपाचे जिल्हा सचिव अशोक मंत्री यांच्या मार्फत देण्यात आले.
गंगापूर येथील भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या पत्रकारांनी गंगापूर येथे निवासी असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव अशोक मंत्री यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना चहा पाण्याची निमंत्रण दिले असून त्यांना चहापानासाठी आमच्या पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये घेऊन या संपूर्ण चहा पानाचा खर्च करू व इतरही व्यवस्था करू अशा प्रकारचे पत्र दिले व बावनकुळे यांना चहापाणासाठी घेऊन याच असे सांगितले. याप्रसंगी राजेंद्र सरोवर रमाकांत बन्सोड, विजय बन्सोड अलीम चाऊस ,इब्राहिम शेख, संपत रोडगे, सदाशिव जंगम, राम गवळी,अमर बाशवान, स्वामी राजपूत,नदीम बागवान आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!