अवैध धंद्यांना पाठीशी घालणा-या प्रभारी सहायक पोलिस निरीक्षकांना बडतर्फ करा.. दिलीप बनकर व संजय जाधव यांची मागणी

प्रभारी सहायक पोलिस निरीक्षकांना बडतर्फ करा दिलीप बनकर व संजय जाधव यांची मागणी

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक शाईनाथ गिते हे त्यांच्या पंटर मार्फत पिस्टल खरेदी करणारांकडून लाखो रुपये उकळतात असा आरोप करण्यात येत आहे.
बोकाळलेले अवैध धंदे बंद करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी दोन वेगवेगळ्या निवेदनांद्वारे पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून गंगापूर पोलिस स्टेशन येथे साईनाथ गिते हे प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून काम करतात. त्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप या निवेदनांत करण्यात आला आहे.

गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहे. यात गुटखा, अवैध रेती व मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र (कट्टा)पिस्टलची विक्री वाढली आहे. यामध्ये गिते हे त्यांच्या पंटर मार्फत पिस्टल खरेदी
करणारांकडून लाखो रुपये उकळतात असा आरोप निवेदनात करण्यात आला असून यासंबंधीची ऑडीओ क्लिप सोबत देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे
गिते यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचे यात म्हटले आहे, गंगापूर पोलिस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहे. यात गुटखा, अवैध रेती व मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र पिस्टल ची विक्री वाढल्याचा आरोप या दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

गिते हे आल्यापासून गंगापूर शहर हे गुंडगीरीच्या विळख्यात सापडले असुन कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचा आरोप करण्यात आला आहे साईनाथ गिते यांच्या काळातील गुन्हे व अवैध धंदे याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी व गिते यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी मनसेचे दिलीप बनकर व राष्ट्रवादीचे संजय जाधव यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

प्रतिक्रिया:-सपोनी शाईनाथ गिते
वाळू माफिया विरोधात मोठी कारवाई करुन आकरा वाहने व त्यांच्या चालक मालक यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्यामुळे माझ्या विरोधात काही राजकीय नेत्यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.या तक्रारीत काही तथ्य नाही यापुढेही अवैध धंद्या विरोधात कठोर कारवाई करणार:- प्रभारी सपोनी शाईनाथ गिते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!