४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची गंगापूर येथे जय्यत तयारी सुरु.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन.

गंगापूर (प्रतिनिधी) मराठवाडा साहित्य परिषदेचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मुक्तानंद महाविद्यालय येथे येत्या २ व ३ डिसेंबर रोजी ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार या संमेलनाध्यक्षपदी नांदेडचे जेष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम हे भुषविणार आहे.
आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकारातून गंगापूर नगरीत पहिल्यांदा मराठवाडा पातळीवरचे संमेलन होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे माजी.आमदार.लक्ष्मणराव मनाळ यांची संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शनिवार २ डिसेंबर रोजी साडे आठ वाजता रमेश डोणगावकर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन होईल गंगापूर शहर ते कविवर्य ना.धों महानोर साहित्यनगरीपर्यंत भव्य ग्रंथदिंडी निघेल. सकाळी दहा वाजता पूर्व संमेलनाध्यक्ष डॉ.शेषराव मोहिते यांच्या हस्ते साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे ग्रंथनगरीचे उद्घाटन होईल. मुख्य उद्घाटन सोहळा जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. त्यानंतर दुपारी दीड वाजता महाष्ट्रातील निवडक नामवंत कवींचे कविसंमेलन देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या संमेलनात विविध विषयावर दोन दिवसांत पाच परिसंवाद संपन्न होणार असून प्राचार्य विठ्ठलराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली ‘म्हणून मी लिहितो/लिहिते’ या विषयावर पहिला परिसंवाद होईल.यात शरद तांदळे ,सुनीता बोर्डे,शाहू पाटोळे,आशा पैठणे,विजय पाथ्रीकर हे लेखक सहभागी होणार आहेत. ‘सत्यशोधक चळवळीचे दीडशे वर्ष! या विषयावर दुसरा परिसंवाद होणार असून डॉ.प्रल्हाद लुलेकर त्याचे अध्यक्ष आहेत.संजय आवटे,संपत देसाई,डी.आर.शेळके,हंसराज भोसले असे वक्ते त्यात सहभागी असतील.
प्र.ई.सोनकांबळे यांच्या ‘आठवाणींचे पक्षी’ या आत्मकथनावर परिचर्चा होणार असून चेतना सोनकांबळे,माणिक पुरी,रामनाथ वाढे,कमलाकर कांबळे हे चर्चक म्हणून चर्चा करतील. सायंकाळी भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन रंगणार असून रवींद्र पांढरे, राम तरटे ,राजेंद्र गहाळ ,शारदा देशमुख,विलास सिंदगीकर हे कथाकार सहभागी असतील. रात्री ८ वाजता प्रा. राजेश सरकटे निर्मित ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’ हा मराठवाड्यातील कवितेचा ८०० वर्षांचा इतिहास मांडणारा काव्यगायनाचा कार्यक्रम संमेलनाचे आकर्षण आहे.
रविवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजाता ‘कवी-गीतकारांशी संवाद या कार्यक्रमात मराठवाड्यातील नामांकित कवी श्रीकांत देशमुख,दासू वैद्य,सुचिता खल्लाळ विनायक पवार यांचा सहभाग असेल समिता जाधव त्यांच्याशी संवाद साधतील. ‘परिघाबाहेरचे साहित्य हुंकार !’या विषयावर तिसरा परिसंवाद रामराजे अत्राम यांच्या अध्यक्षतेखाली होईल.यात देवीदास सौदागर ,धनंजय धुरगुडे ,मोहिब कादरी,सुधीर अनवले,चेतन शिंदे हे सहभागी असतील. ‘मराठवाडा अमृत महोत्सव व मराठवाड्याचे प्रश्न’, या महत्त्वपूर्ण विषयावर चौथा परिसंवाद अशोक बेलखोडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून माजी आमदार अमरसिंह पंडित,जयदेव डोळे, विश्वंभर चौधरी,राजश्री पाटील,केदार काळवणे यांचा सहभाग असणार आहे.दुपारी जेष्ठ कवी रविचंद्र हडसनकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे ‘कविसंमेलन’ होईल.‘संत साहित्य हेच खरे साहित्य ! रा.गो.चौरे यांच्या अध्यक्षतेखाली पाचवा परिसंवाद होणार असून बा.ल.चोथवे,यशवंत सोनुने,मार्तंड कुलकर्णी,मेघना मनगटे,राखी सलगर,अनिल स्वामी हे सहभागी असतील.तसेच विद्यार्थ्यांसाठी बालकुमार मेळावा आयोजित केला असून जेष्ठ बाल साहित्यिक सुरेश सावंत हे त्याचे उद्घाटन करतील. माधव चुकेवाड व धोंडीरामसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बालकथा व बालकवितेचे सादरीकरण होणार असून महत्वाचे बाल साहित्यिक यात सहभागी असतील. तर स्थानिक कवींसाठी ‘कवी गंगापूरचे’ हे तिसरे ‘कविसंमेलन’ संतोष आळंजकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
संमेलनाचा समारोप कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता होईल. असे भरगच्च कार्यक्रम या संमेलनात होणार असून या संमेलनात मराठवाड्यातील व मराठवाड्याबाहेरील कवी, लेखक विचारवंत अभ्यासकांचा सहभाग असणार आहे.असे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.

साहीत्य नगरीला कवी ना धो महानोर यांचे नाव

(काही महिन्यापूर्वीच जेष्ठ कवी ना.धों.महानोर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या साहित्यनगरीला त्यांचे नाव दिले आहे. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठास जगभरात ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळख निर्माण केलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तर दुसऱ्या व्यासपीठास क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,तिसऱ्या व्यासपीठास वैजापूर तालुक्यातील शिऊरचा संत बहेणाबाई यांचे व ग्रंथनगरीस साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे नाव तरुण पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून दिले आहे. गंगापूर सारख्या ग्रामीण भागात होणाऱ्या संमेलनातून या तालुक्यातील वाड्मयीन चळवळीला गती लाभेल ही मला आशा आहे.असे आमदार सतीश चव्हाण म्हणाले.)
साहित्य संमेलन मंडळ पदाधिकारी
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर या हे संमेलनाचे आयोजक / निमंत्रक आहे. मराठी साहित्याचा हा उत्सव उत्कृष्ट होण्यासाठी स्वागतमंडळ प्रयत्न करीत आहे. यात स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ , कार्यवाह त्रिंबकराव पाथ्रीकर,उपाध्यक्ष सुवर्णाताई जाधव सहकार्यवाह प्रकाश भांडवलदार ,प्रशांत माने कोषाध्यक्ष प्राचार्य सी. एस.पाटील व संमेलनाचे समन्वयक गणेश मोहिते, सर्व संयोजन समिती सदस्य कृष्णा ठोंबरे,शेषराव जाधव,मोहसीन चाऊस,श्यामसुंदर सुंदर,मनीष वर्मा,रावसाहेब तोगे,संतोष आंबिलवादे,सुधीर माने,सुधीर माने,बाळासाहेब लगड,संदीप साबणे व महाविद्यालाचे उपप्राचार्य बाळासाहेब पवार,वैशाली बागुल,विशाल साबणे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!