बीएलओ मानधन जमा करा यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर तालुक्यातील बीएलओ मानधन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेले असून प्राप्त मानधन तातडीने जमा करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक सघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
गंगापूर तालुक्यात २७४ बिएलओ व २५ पर्यवेक्षक आहेत.बिएल ओ व पर्यवेक्षक यांचे सन २०२२-२३ चे मानधन तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून अद्यापपर्यंत वितरित करण्यात आलेलें नाही.बीएलओ यांना शैक्षणिक कामाबरोबर अतिरिक्त काम नवीन मतदार नोंदणी, आधार नोंदणी,मतदार यादी दुरुस्ती यासह वर्षभर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनेक कामे करावी लागतात. उन्हाळी सुट्टी व दिपावलीच्या सुट्टीच्या कालावधीतही ही कामे सुरु असतात. सुट्टीच्या कालावधीतील कामाच्या बदल्यात बिएलओ शिक्षकांना अर्जित रजा मंजूर करावी, तसेच ३ वर्षेपेक्षा अधिक कालावधी करिता बिएलओ काम केलेल्या शिक्षकांऐवजी इतर कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात यावे, तसेच बळीराजा सर्वेक्षणातून शिक्षकांना वगळण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिक्षकसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, भगवान हिवाळे,अनिल काळे,गोपीनाथ प्रधान, उद्धव बोचरे,जावेद पटेल, गणेश इखे,शिक्षकभारती तालुका सरचिटणीस अरुण आल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!