पोलिस ठाण्यात पोलिसांना मारहाण करणे पडले महागात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल सर्व आरोपींना अटक..

पोलिसांना मारहाण करणे पडले महागात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल सर्व आरोपींना अटक..
गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील ४९८ च्या आरोपीला नोटीस बजावण्यास आलेल्या पोलिस हवालदारासह गंगापूर पोलिसांना मारहाण करणाऱ्या सात नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश त्रिंबक देवबोणे यांचा शोध घेऊन त्यांना सीआरपीसी कलम 41 (अ) (1) नुसार नोटीस देण्यासाठी उदगीर पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार हे आरोपीच्या घरी गेले असता तेथे त्रिंबक देवबोणे हा मिळुन आल्याने त्याचेकडे ईतर आरोपीबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तपासात सहकार्य करीत नसल्याने त्यांचेकडे इतर आरोपीबाबत चौकशी करण्यासाठी त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात खाजगी वाहनात घेऊन आले असता गंगापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ३ जुन रोजी साडेअकरा वाजता पोलिसांच्या मागुन पाच-सहा अनोळखी पुरुष व तीन महिला असे पोलिस जवळ आले व देवबोणे याचेसोबत बोलु लागले त्यावरुन ते आरोपीचे नातेवाईक असल्याचे समजले. त्यानंतर काहीवेळाने ते सर्व आमचेजवळ येऊन आमचेसोबत हुज्जतबाजी करून आम्ही चौकशी कामी आणलेले आरोपी त्रिंबक देवबोणे यांना आ्त्ताच सोडुन द्या असे म्हणू लागले. त्यावेळी आम्ही त्यांना आरोपी देवबोणे यांचेकडे चौकशी करून लगेच सोडुन देणार आहे असे सांगुन देखील ते आमचे काहीएक ऐकत नव्हते. यातील एक अनोळखी इसमाने आमचेसोबत खाजगी वाहनाजवळ उभा असलेला फिर्यादीचा भाऊ महेश जनार्दन देवबोणे यास शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आम्ही आरोपीच्या नातेवाईकांना आवरत असतांना त्यांनी फिर्यीदीसोबत भांडण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करत असताना पोलीस ठाणे गंगापुरचे पोउपनि शकील शेख, पोह विजय भिल्ल, पोशि अभिजित डहाळे, पोशि/ राठोड, पोशि राहुल वडमारे, पोशि मनोज नवले, मपोशि अमीत पाटील हे मदतीसाठी धावले असता आरोपीच्या नातेवाईकांनी त्यांना धक्कामुक्की करुण मारहाण केल्याने त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली यामध्ये सुखदेव सोपान गोरे, 2) सोपान कारभारी गोरे, राहणार . आपेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर,3) श्रीधर बाबासाहेब बोचरे, 4) अनिकेत प्रकाश चामे, 5) प्रकाश रामनाथ चामे, 6) किरण रामनाथ चामे, रा. कासोडा, ता. गंगापुर 7) निर्मला व्यंकट देवबोणे यांचा समावेश आहे दि.03/06/2023 रोजी 11.30 से 12.00 वा. दरम्यान आम्ही आमचेकडे तपासावर असलेल्या गुन्हयातील आरोपी त्रिंबक देवबोणे यास वरील गुन्हयातील चौकशीकामी पोलीस ठाणे गंगापुर येथे घेऊन आलो असता आरोपीच्या वरील नातेवाईकांनी बेकायदेशिर जमाव जमवुन शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करुन फिर्यादी व पोलीस ठाणे गंगापुर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या सोबत हुज्जतबाजी करून धक्काबुक्की व मारहाण केली म्हणुन पोलिस हवालदार रमेश गुरनाथ कांबळे, वय-55 वर्षे पोलीस ठाणे उदगीर (ग्रामीण), जि.लातुर यांच्या तक्रारीवरून सात आरोपी विरोधात कलम 353,143,149 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!