अल्पवयीन मुलीचे लग्न लावून बलात्कार करणाऱ्या पतीसह पाच जणांवर गंगापूर येथे गुन्हा दाखल


गंगापूर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावणा-या आईसह मुलीच्या पतीवर बलात्कार विनयभंगाचा गुन्हा कोर्टाच्या आदेशानुसार १५६(३) प्रमाणे गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० आक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १ वा. वाहेगाव ता. गंगापुर व २२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी बारा वा. उस्मानपुरा जि. छत्रपती संभाजीनगर येथे फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हिस फिर्यादीची पत्नी आरोपी सुनिता दिपक अस्वले वय ३७ वर्षे रा. उस्मानपुर जि. छत्रपती संभाजीनगर मुलीचे लग्न लावण्याच्या उद्देशाने उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर येथे घेवुन जावुन आरोपी अंबादास निकाळजे वय ५० वर्षे रा.पिर बाजार पोलीस स्टेशन जवळ उस्मानपुरा जि. छत्रपती संभाजीनगर राजु सौदागर नय. ४८ वर्षे रा. पीर बाजार पोलीस स्टेशन जवळ उस्मानपुरा जि छत्रपती
रमेश गराड वय ५८ वर्षे रा. भेर्डापुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर
यांनी आरोपी अभय भागवत कवडे वय, ३५ धंदा मजुरी रा. भर्दापुर ता. श्रीरामपुर जि अहमदनगर याच्याशी पिडीतीचा विवाह लावून दिला आहे. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास आरोपी क्र.०२ ते ०५ यांनी आरोपी अभय भागवत कवडे यांच्याशी उस्मानपुरा, येथे फिर्यादीची अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीरपणे लग्न लावुन दिले आरोपीने पिडीत मुलीसोबत सुहागरात साजरी केली व तीचा बलत्कार केला व आतापर्यंत वारंवार दररोज पिडीत मुलीच्या इच्छेविरुध्द बलत्कार करत असल्याने पाच आरोपींविरोधात मुलीचे वडील दिपक विजय अस्वले ३८ वाहेगाव ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये कलम३७६,३५४,३५४अ,३६६ अ, ५०६ भा.द.वि.सहकलम बा.अधि-२०१२ कलम ४,६,८,१२ सह बाल विवाह अ-२००६ कलम ९,१०,११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!