तुम्ही हलक्या जातीचे आहात असे म्हणुन मारहाण करणाऱ्या मुद्देशवाडगांवच्या चौंघावंर गुन्हा दाखल


गंगापूर (प्रतिनिधी)तुम्ही हलक्या जातीचे आहात तुम्हाला गांवात राहण्याचा काही अधिकार नाही असे म्हणुन मारहाण करणाऱ्या मुद्देशवाडगांवच्या चौंघावर गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा सनिदेवल चव्हाण यांनी गावातील भगवान शांतावन शिरसाठ व ईश्वर शांतावन शिरसाठ यांचे मालकी व ताब्यातील मुद्देशवाडगांव येथे इसार देऊन सहान जागा विकत घेण्याचा करार केला होता सर्व कुटुंब ४ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मिळकतीवर गेले असता त्या ठिकाणी आरोपी मछिंद्र घुणे, बाबुलाल शेख,नजीर शेख व हिलाल शेख हे आले व त्यांनी तुम्ही येथे काय करता असे विचारले असता फिर्यादीने त्यांना सांगितले की,आम्ही ही जागा पुर्वीच्या मालकांकडुन विकत घेतलेली आहे. आम्हाला या जागेवर पत्र्याचे शेड बांधायचे आहे.तेव्हा बाबुलाल शेख यांनी तुम्ही या ठिकाणी पत्र्याचे शेड बांधायचे नाही. असे म्हणुन फिर्यादी व पतीला तुमची पारध्याची जात आहे. तुमची घाण जात आहे असे म्हणुन शिवीगाळ करून तुम्हाला गांवात राहु देणार नाही असे म्हणून चौघांनी लाथा बुक्यांनी मारहाण करायला सुरवात केली. त्यांना मारहाण करु नका असे सांगितले असता बाबुलाल शेख बोलला की, तुम्ही पारधी लोक आहात तुम्हाला आमचे गल्लीत राहण्याचा कोणताही हक्क नाही. तुम्ही हलक्या जातीचे आहात. असे बोलुन मारहाण करुन आरोपी मछिंद्र घुणे,बाबुलाल शेख, नजीर शेख व हिलाल शेख हे निघुन गेले या प्रकरणी शिल्पा सनिदेवल चव्हाण हिच्या फिर्यादीवरून ६ एप्रिल रोजी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम ३२३,५०४,५०६,३४ व
अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९, ३(१)(आर),३(१)(एस), ३(२)(व्हि ए) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!