गंगापूर तालुक्यातील पस्तीस मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी


गंगापूर (प्रतिनिधी)लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पुर्व तयारी च्या अनुषंगाने ८७७ मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांना दिले प्रशिक्षण दांडी बहादरावर कारवाई प्रस्तावित डॉ सुचिता शिंदे.


लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पुर्व तयारीच्या अनुषंगाने ६ व ७ मार्च रोजी मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी १ यांच्या साठी श्री भोडवे पाटील पब्लीक स्कुल गट नंबर ४९ येथे प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते दोन सत्रामध्ये प्रशिक्षण घेण्यात आले सकाळ सत्र व दुपार सत्र या प्रमाणे विभागनी करुण प्रत्येक खोली मध्ये प्रत्यक्ष EVM मशीन हताळनीसाठी उपलब्ध करुण देण्यात आले सर्व अधिकारी यांना १ ते १८ खोल्यामध्ये क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणास ८७७ मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी उपस्थीत होते तसेच ३५ मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी गैरहजर होते त्याच्यांवर कार्यवाही करण्याचे प्रस्तावीत करण्यात आले असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिदे यांनी सांगितले.आलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवश्यक बाबीचे इतंमभुत प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षणात प्रश्न उत्तर स्वरुपात देण्यात आले असुन सर्व उपस्थीत अधिकारी कर्मचारी यांनी प्रश्न उपस्थीत केले विचारलेल्या प्रश्नांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुचिता शिदे व अति सहा निवडणूक निर्णय अधिकारी सतीष सोनी व स्वरुप कंकाळ यांनी उत्तर दिले व सर्वांचे शंका समाधान केले आहे
प्रशिक्षण स्थळी आवश्यक सोई सुविधा पुरविण्यात आल्या होत्या तसेच मोठ्या पडद्यावर प्रात्याक्षीक स्वरुपात प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे तहसिल कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मंडळ अधिकारी तलाठी व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!