गंगापूर येथुन चोवीस वर्षीय विवाहीता  बेपत्ता


गंगापूर (प्रतिनिधी) कपडे आणायला चालले असे सांगून गेलेली चोवीस वर्षीय विवाहीता बेपत्ता झाल्याचे  पतीच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील कल्याणी कृष्णा गवारे वय २४ वर्षे रा. भिवधानोरा ता. गंगापूर हल्ली मुक्काम मयुर पार्क गंगापूर  ही विवाहीता ३ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मयुर पार्क गंगापुर येथुन बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
विवाहीतेचे पती कृष्णा सोमनाथ गवारे यांनी परिसरात शोध घेतला असता कल्याणी गवारे या आढळून न आल्याने कृष्णा गवारे यांनी गंगापूर पोलिसात हरवल्याचा गुन्हा दाखल केला यात म्हटले आहे की पत्नी  कल्याणी कृष्णा गवारे वय २४ वर्ष हिने सासरे यांना मी गंगापूर शहरात माझे कपडे शिवन्यासाठी जात आहे असे सागुन निघुन गेली आहे ती आतापर्यंत घरी आली नाही . तिचे वर्णन अंगात रगीबेरंगी साडी व लाल कलरचे ब्लाऊज ,काळया कलरची सॅडल,  उंची ५ फुट १ इच रंग गोरा वरील वर्णनाची विवाहीता आढळून आल्यास गंगापूर पोलिस स्टेशन किंवा सफौ डि के थोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!