गंगापूर शहरात विना परवानगी बॅनर लावणा-यांवर कारवाई कोण करणार? महसूल वसूल होणार का? मोठ्यांचा आला गाडा गरिबांचे घर मोडा अशी अवस्था गंगापूर वासियांची झाली.

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शहरात विना परवानगी रस्त्यावर व चौकात एका सत्ताधारी पक्षाच्या (आमदार) नेत्यांचे वाढदिवस बॅनर लावणा-यांवर कारवाई करुन महसूल जमा होणार आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
गंगापूर शहरात मागील काही दिवसांपूर्वी पोलिस व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तरित्या मोहीम राबवून विनापरवानगी बॅनर लावाल तर गुन्हे दाखल करणार असा सज्जड दम भरणारे पोलीस विनापरवानगी बॅनर लावणाराच्या विरोधात कारवाई करणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून केला जात आहे

एरवी सर्वसामान्य नागरिकाकडून एखादा बॅनर लावला तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मागील महिन्यामध्ये गंगापूर पोलीसांनी दिला होता दरम्यान गंगापूर शहरात २६ जानेवारी रोजी शिवाजी चौक ते लासुर नाका २३ बॅनर शिवाजी चौक ते पंचायत समिती १२ बॅनर कार्यक्रम स्थळी २,शिवाजी चौक २,राजीव गांधी चौक १ एकूण ४० बॅनर रस्त्यावर व चौकात लावण्यात आले आहे परवानगी न घेतल्याने नगर पालिकेचा महसूल बुडाला असुन बॅनर लावणा-यांवर कठोर व दंडात्मक कारवाई कोण करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे

प्रतिक्रिया :-
पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले:- शहरातील नागरिकांना शिस्त लागावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु शहराचे विद्रुपीकरण कोणीही करू नये तसेच रस्त्यावरील पोलवर बॅनर लावल्याने अपघाताची शक्यता आहे नगरपालिका यासाठी परवानगी देत नाही.कोणीही पोलवर बॅनर लावु नये तसेच बॅनरच्या बाबतीत नगर परिषदेने आमच्याकडे परवानगी न घेणा-यांच्या विरोधात रितसर तक्रार दिल्यास आम्ही गुन्हे दाखल करणार.परंतु नगर परिषदेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद भेटत नाही.

प्रदीप भैय्या पाटील माजी नगरसेवक:- बॅनर साठी सर्वसामान्यांनाच नियम लावले जातात तर मोठ्यांना का नाही.नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने सरसकट नियमावली तयार करून कारवाई करणे अपेक्षित आहे यात दुजाभाव न करता कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!