कायगांव येथील स्वस्त धान्य दुकानाच्या गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करावी नसता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा लाभार्थ्यांनी दिला.

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील कायगांव येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ११ चे चालक अनिल भागचंद उचित हे कायगांव येथील स्वस्त धान्य दुकानातील ग्राहकांना धान्य,गहु, तांदुळ,आदी वस्तू देत नसुन तसेच दररोज दुकान न उघडता मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून या दुकानाची चौकशी करून दुकान इतरांना चालवण्यासाठी देउन संबधिताविरोधात कारवाई करावी अन्यथा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ११ चे चालक अनिल भागचंद उचित हे कायगांव येथील स्वस्त धान्य दुकानातील अनेक ग्राहकांना धान्य,गहु, तांदुळ,आदी वस्तू देत नाही तसेच दररोज दुकान उघडत नाही, तसेच ग्राहकांना पावत्या देत नाही, दुकानाच्या दर्शनी भागात वस्तुंच्या दर बाबत फलक नाही, ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानाच्या वस्तू न देता सर्रासपणे काळ्या बाजारात विक्री करत मनमानी पद्धतीने कारभार करत असून दुकानदारांच्या मनमानी कारभारास ग्राहक वैतागले आहे.दुकान क्र. ११ चे चालक अनिल भागचंद उचित हे ग्राहकांना न जुमानता तुम्हाला काय करायचे ते करा माझे कोणीही काही वाकडे करणार नाही असे ग्राहकांना धमकावत आहे.याच्या सर्व गैरकारभाराची चौकशी करून कारवाई करावी तसेच दुकान इतरांना चालवण्यासाठी द्यावी नसता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी कान्हे, रामचंद्र बिरुटे, अशोक फटांगडे, भिवसेन चित्ते ,अंबादास गायकवाड, शिवाजी गायकवाड, दीपक आवारे, शितल माळी, वनिता बिरुटे ,वैभव बिरुटे,आदी ग्राहकांनी तहसीलदार यांच्या कडे निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!