सावधान  शेतवस्तीवरील वयोवृद्ध दाम्पत्याला चाकुचा धाक दाखवून सहा लाखाला लुटले. श्वानने खदानीपर्यंत काढला माग गंगापूर शहराजवळील घटना 

गंगापूर (प्रतिनिधी) शहराजवळील एका शेतवस्तीवर वयोवृद्ध दाम्पत्याला रात्री एक वाजता अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मारहाण करीत चाकुचा धाक दाखवून १५ हजार रोखरकमेसह पाचतोळे सोने व चांदीचे दागिने लुटून चोरटे पसार झाले या घटनेमुळे शेतवस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

गंगापूर शिवारात मदर टेरेसा पब्लिक स्कूलच्या पाठीमागे गट क्रमांक २९०/२ मध्ये भगवान पाडळकर व त्यांची पत्नी शेतामध्ये राहत होते.३ मार्च रविवारी रात्री एक आणि दोन वाजेच्या दरम्यान तीन अज्ञान चोरटे घरामध्ये घुसून चंद्रप्रभा भगवानराव पाडळकर(७०) व भगवानराव पाडळकर (७५) यांना मारहाण करून गळ्याला चाकू लावुन चंद्रप्रभाबाई यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले व घरात ठेवलेले साडेसहा तोळे सोन्याचे दागिने, चारशे ग्राम चांदी व रोख पंधरा हजार रुपये असा एकूण सहा सात लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती पाडळकर यांनी पोलिसांचे हेल्पलाइन ११२ वर कॉल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील श्वान पथक घटनास्थळी आले असता श्वानने खदानीपर्यंत पर्यंत माग काढला या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि केदारनाथ पालवे, दिनकर थोरे हे करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!