सातबारावर कर्ज बोजा टाकण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. एक हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिंधी सिरजगांवच्या तलाठी साळवे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार- पुरुष, वय- 56 वर्ष,रा , कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील छप्पन वर्षीय शेतकऱ्यांने गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव तालुका गंगापूर येथील गट नंबर ६२ येथे एक हेक्टर ४४ आर शेतजमीन आहे शेती विकासाची कामे करण्यासाठी त्यांनी आरबीएल बँक संभाजीनगर येथून बारा लाख ७४ हजार ८५५ रुपयाचे कर्ज मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे कर्ज मंजूर होण्याकरिता तक्रारदार यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचा बोजा चढविण्याकरिता व महाराष्ट्र महसूल अधिनियम महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ नमुना ९ ची नोटीस काढण्याकरिता सिंधी सिरजगांवचे तलाठी विनोद भाऊराव साळवे वय 44 वर्ष पद तलाठी (वर्ग तीन)यांनी दोन हजार रुपयाची मागणी करून एक हजार रुपये लाच मागणीच्या वेळी पंचा समक्ष घेतले व नोटीस प्रकाशित केल्यानंतर दिनांक २२ फेब्रुवारी रोजी उर्वरित एक हजार रुपयाची लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारले असता रंगे हाथ पकडण्यात आले असून दौलताबाद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे .ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,पोलीस उपअधिक्षक दिलीप साबळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद अघाव, पोलीस उपाधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जीवडे, पाटील, पाठक, चालक पोलीस अंमलदार शिंदे, बागुल यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांचेकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ अमाचेशी संपर्क साधावा.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:- 1064
पोलीस अधीक्षक, लाप्रवि. छत्रपती संभाजीनगर :- 9923023361

पोलीस उपाधीक्षक दिलीप साबळे ९५४५९५०४२१ वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!