गंगापूर तालुक्यातील युवकाने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण(बलात्कार) करीत व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्याने गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुली सोबत शारीरीक संबध प्रास्थापीत करून त्याचे व्हिडीओ कॉल व्हायरल करीत बदनामी करण्यात आल्याची घटना २३ डिसेंबर ते १३ जानेवारी दरम्यान बिड बायपास रोडवरील हिवाळे लॉज येथे घडली. या प्रकरणी पिडीत तरूणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार हि तरुणी अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत शिवा दत्तात्रय सुकासे (रा. नागापुर, ता. गंगापुर) याने लग्नाचे आमिष दाखवत बिड बायपास रोडवरील हिवाळे लॉजवर नेत जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. तसेच लॉजमधून आरोपी शिवा याने त्याचा भाऊ विकास याला केलेल्या व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग केले. यामध्ये पिडीत तरुणी आणि आरोपी शिवा हे सोबत असल्याचे दिसत आहे. हि रेकींग आरोपींनी व्हायरल केली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन सातारा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक लंभारे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!