मित्राच्या हळदीचा कार्यक्रम करून घरी जाणा-या युवकाला टिप्परने उडवले. लासुरस्टेशन सावंगी चौकात अपघात. चिंचखेड्याच्या युवकाचा जागीच मृत्यू…..

गंगापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर स्टेशन येथील सावंगी चौकात टिप्परच्या व मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत एक ठार तर एक जखमी झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी २९ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अज्ञात टिप्परने स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच २० जी एल १२९३ हीला जोरदार धडक दिल्याने युवक विजय जनार्धन डुबे यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जन जखमी झाला असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत
विजय डूबे हा चिंचखेडा येथील रहिवासी असून काल मित्राच्या हळदीचा कार्यक्रम उरकून चिंचखेडा येथे घरी परतत असताना सावंगी चौकात अज्ञात टिप्परने धडक दिल्याने विजयचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण जखमी असल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे दरम्यान विजय दुबे यास लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस बिट अंमलदार तात्याराव बेद्रे हे करत आहे.

अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर असल्याची नागरिकांत चर्चा…….

ह्या दुर्दैवी मृत्यूस कारणीभूत ठरणारा टिप्पर हा अवैध वाळु वाहतूक करणारा असल्याची चर्चा लासुर स्टेशन सह पंचक्रोशीतील गावामध्ये आहे कारण सावंगी चौकामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका रिकाम्या टिप्परच्या धडकेत सदर मोटरसायकल अपघात ग्रस्त होऊन सदर युवक जागीच गतप्राण झाला होता असे सिसिटीव्ही फुटेज मध्ये दिसत असून अपघात झाल्यावरही तो टिप्पर सुसाट वेगाने पळून गेला त्यामुळे लासुर स्टेशन सह पंचक्रोशीत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस व महसूल विभाग अर्थपूर्ण कानाडोळा करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!