गंगापूर शहरातील मंडप साहित्याच्या गोदमास आग.. लाखोंचे साहित्य जळुन खाक…नपची अग्निशमन गाडी दीड वर्षापासून नादुरुस्त

गंगापूर शहरातील मंडप साहित्याच्या गोदमास आग.. लाखोंचे साहित्य जळुन खाक…नपची अग्निशमन गाडी दीड वर्षापासून नादुरुस्त
गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील जयसिंग नगर परिसरात मंडप साहित्याच्या गोदमास आग लागुन अंदाजे १२ ते १४ लाख रुपयांचे मंडप साहित्यासह एक टॅम्पो जळुन भस्मसात झाला ही घटना १५ मे रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयसिंग नगर भागातील दिपाली लाॅन्सच्या बाजुला गणेश मंडपचे मालक रमेश गायकवाड यांनी दोन दिवसांपुर्वी या गोडावुनमध्ये मंडपाचे सर्व साहित्य आणुन ठेवले होते सर्व साहित्य व्यवस्थीत लावून ते बारा वाजता घरी गेले मध्यरात्री दोन ते तीन वाजता या गोडावुनमध्ये अचानक आग लागली परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती गायकवाड यांना कळविले व आग विझवण्याचे काम नागरिकांनी केले परंतु आग आटोक्यात आली नाही या आगीत बांबू, पडदे, लोखंडी रॉड,स्टेज ,कुलर , टॅम्पो,जनरेटर, सजावट साहित्याने पेट घेतल्याने या आगीत गोडावुनसह १२ ते १४ लाख रुपयांचे मंडप साहित्यासह टॅम्पो जळुन भस्मसात झाला .
नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मंडपाचे नुकसान.
सध्या शहरात पारा ४२अंश असुन अचानक कुठेही आग लागु शकते परंतु नगरपालिकीने गेल्या दिड वर्षांपासून बंद असलेल्या अग्निशमन दलाची गाडी दुरुस्त केली नाही. किरकोळ कारणावरून बंद पडलेली आहे ही गाडी सुरू केली असती तर मंडप मालकाचे लाखों रुपयांचे नुकसान टळले असते ही गाडी दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मंडप मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!