गंगापूर शहरातील तीन सराफी दुकाना अज्ञात चोरट्यांनी फोडून पोलीसांना मोठे आव्हान दिले.

गंगापूर शहरातील तीन सराफी दुकाना अज्ञात चोरट्यांनी फोडून पोलीसांना मोठे आव्हान दिलेसुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणपती मंदिर ते डॉ सुर्यवंशी या रोडवरील दिनेश अंलकार ग्रामीण बॅंक शेजारी, तिरुपती ज्वेलर्स व जाधव सराफ यांच्या दुकाना ३० जुन ते १ जुलै रोजी पहाटे अज्ञात चोरांनी शटरचे कोंडे कटरने कट करून दुकानात प्रवेश करुन तिरुपती ज्वेलर्स दुकानातुन ४०० ग्रॅम चांदी अंदाजे किंमत ३० हजार रुपये जाधव सराफ यांच्या दुकानातील ३० चांदीच्या अंगठ्या व पाचशे रुपये रोख व दिनेश अंलकार या दुकाणाची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तिजोरी फोडता न आल्याने चोरट्यांना खाली हात जाण्याची वेळ आली. या घटनेमुळे शहरातील व्यावसायिकांसह सराफा दुकानदारामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे या चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी गंगापूर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर अज्ञात चोरांनी दुकाना फोडुन पोलीसांना आव्हान दिले आहे.

एक ते दीड महिन्यापूर्वी ऐश्वर्या काॅप्लॅक्स मधील ज्योतिर्लिंग ज्वेलर्स फोडून दोनशे ते तीनशे ग्रॅम सोने चोरट्यांनी नेले होते त्याच्या तपास अद्यापही लागला नसल्याने व्यापा-यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!