समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू, ४ मुलांचाही समावेश समृद्धी महामार्गावरील किंचाळ्या, आरोळ्या अन् मृत्यूचं तांडव!

पिंपळखुटा येथील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू, ४ मुलांचाही समावेश समृद्धी महामार्गावरील किंचाळ्या, आरोळ्या अन मृत्युचे तांडव
बुलढाणा (प्रतिनिधी)नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भर्कन पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग भीषण होती. आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली.
ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री 1 ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. किंचाळ्या, आक्रोश सुरू होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे या बसमधील २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून ३० प्रवाशी प्रवास करत होते.

*घटना क्रम*
बसमधील जखमींना तातडीनं उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते.

समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झालाय.

चालकाला झोप लागल्यामुळं बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीये. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीनं उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. यातील ५ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.
या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. यात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. काही प्रवासी गाडीच्या काचा फोडून आले बाहेर ही बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली. त्यानंतर ही बस रस्ता दुभाजकाला धडकली. त्यानंतर बस पलटी झाली. बसचा दरवाजा गाडीखाली आल्यानं कोणालाच बाहेर येता आलं नाही. वाचलेले प्रवासी गाडीच्या काचा फोडून बाहेर आले.

बसचे दार खाली दबले पोलीस आणि घटनास्थळी असलेल्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बस सर्वात आधी नागपूरवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी पोलला धडकली. अनियंत्रित होऊन पुढं जाऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लेनच्या मध्ये असलेल्या काँक्रिटच्या दुभाजकाला धडकली आणि पलटली. बस पलटी होताना डाव्या बाजूने पलटली. त्यामुळं बसचे दार खाली दाबले गेले. त्यामुळं लोकांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बसमधील डिझेल सांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!