शिंगी येथे कुत्र्याच्या हल्ल्यातुन बाबा पटेल यांनी हरीनीचे प्राण वाचवले

शिंगी येथे कुत्र्याच्या हल्ल्यातुन बाबा पटेल यांनी हरीनीचे प्राण वाचवले


गंगापूर (प्रतिनिधी )तालुक्यातील शिंगी येथे कुत्र्याच्या हल्ल्यातुन बाबा पटेल यांनी हरीनीला वाचवले.
शिंगी येथील बाबा पटेल यांच्या गट नंबर १५ पिंपरी शिवार येथे ११ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चार ते पाच कुत्र्यांनी हरणावर हल्ला केला.
बाबा पटेल यांना कुत्र्यांचा आवाज आला असता त्यांनी तिकडे जाऊन बघितले तर त्यांना हरीण घायळ झालेली दिसली त्यांनी कुत्र्यांना हाकलून घटनेची माहिती घरच्यांना दिली असता कलीम पटेल यांनी त्या हरणाला उचलून घरी आणून प्रथमोपचार केले. त्यानंतर वनविभाग अधिकारी यांना माहिती दिली. वन मजूर अशोक गवळी यांनी घटनास्थळी येऊन त्या हरणाला घेऊन गेले. यावेळी बाळू तिखे, सागर लेकुरवाळे, कौसर भाई, कलीम पटेल पत्रकार सुनिल झिंजूर्डे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!