दुर्दैवी घटना गंगापूर येथे एकवीस वर्षीय युवकाची मोबाईल टावरच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या


गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील एकवीस वर्षीय युवकाची मोबाईल टावरच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपक आप्पासाहेब निरफळ (२१) राहणार लक्ष्मी काॅलनी हा खाजगी टावर कंपनी मध्ये कामाला होता तो रात्रीपासून घरुन निघून गेला होता त्याने गंगापूर शहरातील खंडोबा मंदिरासमोरील एका खासगी दुकानाच्या वरती असलेल्या मोबाईल टावरच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती मिळताच पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता त्याने सुती दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याला खाली उतरून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!