गंगापूर खुलताबाद तालुक्यातील दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत अबॅकस प्रशिक्षण; आमदार प्रशांत बंब यांचा पुन्हा नवीन अभिनव शैक्षणिक उपक्रम


गंगापूर (प्रतिनिधी)
गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभिनव शैक्षणिक उपक्रम सुरू केला असून यामध्ये गंगापूर – खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना मोफत अबॅकस प्रशिक्षण दिले जाणार आहे. गेल्या वर्षी 30 जून 2023 रोजी गंगापूर येथे आमदार बंब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली होती. तर ११ जानेवारी २४ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान या शैक्षणिक उपक्रमाचा पहिल्या टप्पा एकुण १७ शाळेत सुरू झाला असून गंगापूर तालुक्यातील १४ तर खुलताबाद तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळेतील दोन हजार ५२० शालेय विद्यार्थी दहा प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून अबॅकसचे धडे घेत आहेत. तर पुढील काही दिवसात बंब यांच्या मतदारसंघातील सर्वच जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम सुरू होणार आहे. या शैक्षणिक उपक्रमासाठी लागणारा संपूर्ण खर्च आमदार बंब स्वतः करीत आहेत.
मतदार संघात आमदार बंब हे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अभिनव शैक्षणिक उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली असून यामुळे त्यांचे पालकातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया :
जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत घेतात. अबॅकस प्रशिक्षणाची फीस सर्वसामान्य कुटुंबियांना त्यांच्या पाल्यांना परवडणाऱ्यासारखी नसते. बौद्धिक विकास करणारा हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देत, या माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकासासह सर्वांगीण विकास साध्य करणार असल्याचे प्रशांत बंब म्हणाले.

अबॅकस म्हणजे काय ?
अबॅकस म्हणजे ही एक गणित सोडवण्याची पद्धती असून यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया वेगाने केल्या जातात. यात विद्यार्थ्यांची लिखाण गती,ऐकण्याची क्षमता, दृश्य प्रतिमा आठवण्याची क्षमता या सारखी कौशल्य अबॅकस प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकसित होतात.

गंगापूर – खुलताबाद तालुक्यातील पहिल्या टप्प्यात या १७ शाळेंचा समावेश :
लासुर स्टेशन जिल्हा परिषद उर्दू, जिल्हा परिषद मराठी,
जिल्हा परिषद गवळीशिवरा, टोकी, शिल्लेगाव, शिरेगाव, धामोरी खु,डोणगाव, खडकनारळा, वसुसायगाव,देवळी, सावंगी, खुलताबाद मधील जिल्हा परिषद वेरूळ, खुलताबाद मराठी , खुलताबाद उर्दू, गदाना या शाळेंचा समावेश केला आहे.

किती खर्च :
अबॅकस हा अभ्यासक्रम आठ लेव्हलचा असून खाजगी शिकवणी मध्ये प्रत्येक लेवलसाठी सुमारे चार हजार रुपये फीस घेतली जाते.संपूर्ण आठ ही लेव्हलचा खर्च प्रति विद्यार्थी सुमारे वीस हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!