शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गंगापूरच्या जनतेशी संवाद साधणार.


गंगापूर (प्रतिनिधी) उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गंगापूर येथे सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी जनतेशी संवाद साधणार

यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोमवारी, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विमानान शहरात आगमन होईल. दुपारी १२ वाजता गंगापूर येथील पंचायत समिती आवारात जनतेशी संवाद साधतील,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!