गंगापूर येथे शाळा कॉलेजवर चकरा मारणा-या रोडरोमिओंचा त्वरित बंदोबस्त करावा.

गंगापूर येथे शाळा कॉलेजवर चकरा मारणा-या रोडरोमिओंचा त्वरित बंदोबस्त करावा.
गंगापूर (प्रतिनिधी) शहरातील शाळा कॉलेजवर चकरा मारणा-या रोडरोमिओना आवर घालावा व बस- स्थानक व कॉलेजवर पोलिसांनी लक्ष देवुन विद्यार्थिनींचे धैर्य वाढवावे.
तसेच मुलींना दामिनी पथकाद्वारे मार्गदर्शन करावे.
आज-काल न्युज पेपर इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये रोज कुठे ना कुठे मुलींवर हल्ले झालेले वाचनास किंवा ऐकण्यास मिळतात पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात मुलींवर भर चौकात कोयत्याने हल्ला होतो मुंबईमध्ये लव इन रिलेशनशिपमध्ये राहणारा मुलगा आपल्या प्रियसीला मारून तिचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवतो यांसारख्या मानसिकतेवरून लक्षात येते की नकार ऐकण्याची मानसिकता लोकांची नाही. त्यामुळे असे हल्ले होतात तर अशा प्रकारच्या घटना शहरात घडू नये यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने गंगापूर पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना निवेदन देवून रोडरोमीयोंना आवर घालावा अशी मागणी केली यावेळी पृथ्वीराज तोगे सुदर्शन थोरात, निलेश वाघमारे, पोपट खरात, सागर शिंदे,यश वाघमारे,रुद्रा रमैया,शुभम भंनगे, रवी खाजेकर,सिद्धांत घेगडमल आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!