एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अडकला एसीबी च्या जाळ्यात!

एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात!


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)दाखल गुन्ह्यात साक्षीदार याला आरोपी न करण्यासाठी १ लाख ६० रुपये लाचेची मागणी करुन १ लाख रुपये लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

अशफाक मुस्ताक शेख, वय 37 वर्ष असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी १४ जुलै रोजी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ३९ वर्षाच्या व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे. अशफाक मुस्ताक शेख जिन्सी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. शेख यांनी 19/05/2023, व 12/07/2023 रोजी यातील तक्रारदार यांच्याकडे पोलीस ठाणे जीन्सी येथील दाखल गुन्ह्यात साक्षीदार याला आरोपी न करण्यासाठी ५० हजार रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून तक्रारदार हे लाचेची रक्कम ३० हजार रुपये देण्यास गेले असता परत तक्रारदार यांना सदर गुन्ह्यातील पूर्वी अटक केलेल्या आरोपीकडे ३ लाख रूपया मधील बाकी राहिलेले १ लाख १० हजार रुपये परस्पर लाचेची मागणी करून त्यातील ७० हजार रुपये तडजोड करून असे दोन्ही मिळून १ लाख रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. पो ठाणे सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे,अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर,पोलीस अंमलदार सिनकर,वाघ, नागरगोजे, चालक पोअं चंद्रकांत शिंदे, चांगदेव बागुल आदींनी केली

भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
टोल फ्री क्र:- 1064
पोलीस अधीक्षक ला प्र वि औरंगाबाद: 9923023361 संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!