मोमोज खाणे आले अंगाशी. मित्रांसोबत पैज लावली, पैज जिंकला मात्र आयुष्याशी हरला !

मोमोज खाणे आले अंगाशी मित्रांसोबत पैज लावली, पैज जिंकला मात्र आयुष्याशी हरला !

हल्लीची तरुणाई फास्ट फूडच्या अधीन गेली आहे. पिझ्झा, बर्गर, चायनीज, मोमोज हे पदार्थ तरुणाईला अधिक प्रिय असतात. पण हेच फास्ट फूड कधी कधी जीवावर बेतू शकतं याचं उदाहरण देणारी घटना बिहारमध्ये घडली आहे.

गोपालगंज (प्रतिनिधी) तरुणाईमध्ये हल्ली मोमोज खाण्याची क्रेझ फार वाढली आहे. हीच क्रेझ एका तरुणाला महागात पडली आहे. मोमोज खाल्ल्यानंतर तरुणाला अस्वस्थ वाटू लागले, मग काही वेळात तो बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विपिन कुमार पासवान असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मोबाईल शॉप चालवायचा. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस मृत्यू प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला? हे तपासाअंतीच स्पष्ट होईल. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

मोमोज खाण्याची पैज जीवावर बेतली

विपिन शुक्रवारी आपल्या दुकानात बसला होता. त्याचे मित्र आले आणि त्याला मोमोज खायला सोबत घेऊन गेले. मित्रांमध्ये कोण किती मोमोज खाणार याबाबत पैज लागली होती. यावेळी विपीनने 150 मोमोज खाऊन पैज जिंकली. यानंतर सर्व आपापल्या कामाला परत निघून गेले. विपिनही त्याच्या दुकानात आला. मात्र दुकानात आल्यानंतर थोड्या वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर बेशुद्ध पडला.

कुटुंबीयांचा हत्या झाल्याचा आरोप

घरच्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या मुत्यूनंतर कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. आपला मुलगा मोमोज खाऊन मेला नाही कर त्याला विष घालून मारण्यात आले आहे, असा आई-वडिलांनी आरोप केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!