उसाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीला पिकअपची पाठीमागून धडक एक ठार तर चौदा जखमी गंगापूर वैजापूर रोडवरील घटना

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर वैजापूर रोडवरील तांबोळगोटा येथे भरधाव बोलेरो पिकअपची उसाच्या ट्रॅक्टर ट्राॅलीला  पाठीमागून धडक एक ठार १४ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

गंगापूर वैजापूर रोडवरील तांबोळगोटा वरखेड पाठीजवळ २७ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता बोलेरो पिकप गाडीने भरलेल्या उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली असता एक जण ठार तर १४ जण जखमी झाले आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारी रोजी पहाटे किरण बाळू दहाइंजे राहणार इस्लामपूर जिल्हा सोलापूर हा चालक बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच.४५ ए.एफ.८५१५ हे वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे समोर चालू असलेले अर्जुन कंपनीच्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये चालकाच्या शेजारी बसलेला शरद संतोष कोळी (३८) हा ठार झाला असून सोनाली युवराज, साया भारी, कृष्णा भोडसे, गिताबाई, कामाबाई, अबिता तिरसी,बाळू ठाकरे, बापूराव भोडसे,मच्छिंद्र भोडसे, राजा भाऊसाहेब,साबीन भवन,विकास भोडसे, किरण बाळू, युवराज असे १४ जण जखमी झाले आहे. जखमींना गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरील बोलेरो पिकअप च्या चालकावर आपघातास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नसीर शेख अपसनवाड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!