मोटारसायकलच्या धडकेत पशुवैद्यकीय अधिकारी ठार. अवयव दानानंतर करणार अंत्यसंस्कार.

गंगापूर (प्रतिनिधी) मोटारसायकलस्वाराने पायी जाणाऱ्या पशुवैद्यकीय अधिका-याला दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू.अवयव दानानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरातील जयसिंग नगर मधील पशुवैद्यकीय डॉ. दिनेश छोटीराम कुंधारे हे अवकाळी वातावरण असताना १० जानेवारीला सायंकाळी लासुरनाक्यावर जात असताना ट्रिपलसिट अल्पवयीन असलेल्या मोटारसायकल स्वाराने जोरदार धडक दिली यात डॉ कुंधारे यांच्या डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांनी मरणोत्तर अवयवदान संकल्प केला होता त्या नुसार त्यांचे अवयव दान दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे ते वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी होते त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा छोटा परिवार, या मोठ्या मुलीचे नुकतेच लग्न जमलेले आहे या प्रकरणी अद्याप पर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

पालकांनी मुलांच्या हट्टापायी मुलांकडे मोटरसायकली देने बंद करावे
लहान मुलांना गाडी चालवायचे ज्ञान नसते त्यांच्या हातुन दुर्घटना होऊ शकते आपल्या मुलांचा जीव जेवढा महत्वाचा आहे तेवढाच समोरच्या व्यक्तीचा देखील आहे मुले शिस्तीत चालत नाही आणि त्याचा फटका विनाकारण शिस्तीत चालणाऱ्या व्यक्तीला बसतो त्याचाच फटका डॉक्टरच्या बाबतींत घडला आहे डॉक्टर डाव्या बाजूने शिस्तीत पायी चालले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!