समृद्धी महामार्गावर कार 30 फूट खाली कोसळून पती जागीच ठार तर पत्नी मुलगी जखमी

समृद्धी महामार्गावर कार 30 फूट खाली कोसळून पती जागीच ठार तर पत्नी मुलगी जखमी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तिस फूट खाली कोसळून पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी व मुलगी जखमी.
मृत हे अकोला येथील शासकीय महिला रुग्णालयातील कर्मचारी; पत्नी, लहान मुलगा गंभीर जखमी
समृद्धीमहामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने जयपूर- भांबर्डा शिवारात सुरक्षा कठडे तोडून महामार्गा खाली ३० फूट खोल शेतात कोसळली. यात सुशीलकुमार दिलीप थोरात ( ३८ रा. मालेगाव जि. वाशिम ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी बबिता व लहान मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. 

अकोला येथील शासकीय महिला रुग्णालयातील कर्मचारी सुशीलकुमार थोरात हे आज पहाटे पत्नी बबिता आणि लहान मुलासोबत कारने ( एम एच २० बी बी ९७९३) छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. सुशीलकुमार हे स्वतः वाहन चालवत होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जयपूर- भांबर्डा शिवारात पहाटे सहा वाजेला त्यांचे नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूचे सुरक्षा कठडे तोडून महामार्गावरून ३० फूट खाली फेकल्या गेली. 

अपघातस्थळी शेतात आखाडा असल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ करमाड पोलीस ठाण्याशी संपर्क केला. माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, बीट जमादार सुनील गोरे, दादासाहेब ढवळे, विनोद खिल्लारे , रिवेश निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात सुशीलकुमार थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे रवाना केले. मृत सुशीलकुमार आणि त्यांची पत्नी बबिता दोघेही अकोला येथील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी असल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!