मोटारसायकल टॅम्पोच्या धडकेत एक ठार एक जखमी


गंगापूर (प्रतिनिधी) लासूर स्टेशन गंगापूर रोडवर दुचाकी व टेम्पोच्या झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाला हा अपघात १२ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान झाला आहे.

गंगापूर तालुक्यातील शरीफपुरवाडी येथील विश्वास बाबासाहेब साळवे व गणेश मोहन वंजारे हे मोटारसायकल क्रमांक एम एच २० जी आर ५६६९ बसुन जात असताना लासुर स्टेशन गंगापूर रोडवरील शिवम फर्निचरजवळ मोटरसायकल व टेम्पोचा भीषण अपघात झाला असून या अपघातात शरीफपुरवाडी येथील विश्वास बाबासाहेब साळवे (२३ वर्ष ) हा युवक जागीच ठार झाला असून गणेश मोहन वंजारे (वय २७) हा जबर जखमी झाला दरम्यान अपघात ग्रस्तांना लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी साळवेला मृत घोषित केले तर जखमी तरुणांस लासुर स्टेशन येथील युवकांनी रुग्णवाहीकेद्वारे छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवले आहे सदर अपघात हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच २० जी आर ५६६९ तर टेम्पो क्रमांक एम एच १४ व्ही ०३१० यां दोन वाहनांमध्ये रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला असून मयत युवक हा एकुलता एक असल्याचे समजते. या घटनेची बातमी लिहीण्यापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!