साखरपुड्याला जाणा-या ट्रॅव्हलचा अपघात व-हाडी बालंबाल बचावले

साखरपुड्याला जाणा-या ट्रॅव्हलचा अपघात व-हाडी बालंबाल बचावले..

लिंबेजळगाव (प्रतिनिधी) साखरपुड्याकरता बारामतीहुन संभाजीनगरात येणाऱ्या खाजगी टँव्हल्स बसचे टायर फुटल्याने बस डिव्हायडर वरुन विरुद्ध दीशेला जाऊन धडकली. मात्र अपघात भिषण असला तरी कुणीही जखमी झाले नाही.
संभाजीनगर नगर राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील हाँटेल वृदावन समोर शुक्रवारी २४ जुन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बारामतीहुन संभाजीनगरात बीडबायपास परीसरात चौधर परीवार बारामतीहुन खाजगी टँव्हल्स (एम एच 2525) बसणे येत असतांना अचानक बसचे टायर फुटल्याने बस विरुद्ध दीशेला जाऊन एक कंपाउड वालला धडकली, सुदैवाने संभाजीनगरहुन नगरकडे जाण्यासाठी विरुद्ध दीशेला एकही वाहन जात नसल्याने आज मोठा अनर्थ टळला. बस पहाटेच बारामतीहुन निघाल्याने पागीमागे 20 किलोमीटर अंतरावर अल्पाहार केल्याने काही प्रवासी झोपेत असल्याचे संदीप चौधर या व-हाडींनी सागीतले.
अपघात होताच येथील सुदर्शन गवळी सह कर्मचाऱ्यांनी धावाधाव करीत बसमधील सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढले. घाबरलेल्या व-हाडींना दीलासा देत शांत केले. घटनेचे स्वरुप वधुपक्षाला सागीतले असता त्यांनी पाच ते दहा वाहनाद्वारे व-हाडी शहरात नेऊन कार्यक्रम उरकता घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!