गंगापूर कोर्टासमोर टॅम्पोने नागरीक व मोटारसायकलला चिरडले यात चार गंभीर जखमी


गंगापूर (प्रतिनिधी) कोर्टासमोर टॅम्पोने फुटपाथवरी नागरिकांसह मोटारसायकल उडवले यात पाच नागरीक जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ कोर्टाच्या समोर विना क्रमांकांच्या खडीच्या टॅम्पोने ११ मार्च रोजी दुपारी दिड वाजता भरधाव वेगाने येवून रोडच्या बाजूला लावलेल्या मोटारसायकली व फुटपाथवरी पाच सहा नागरिकांना उठवले या अपघातात चार मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले तर गंगापूर येथील बुलढाणा बॅंकेचे व्यवस्थापक अनंत पिसाट (५८) ,विनोद काशीनाथ शिंदे(२८) राहणार पिंपरखेडा, फातमाबी अमीन पटेल (६५) राहणार गंगापूर, व अमोल एकनाथ कनगरे (२६) राहणार नेवरगांव यांना उडवले या सर्वांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक नागरिक व रुग्ण वाहीका चालक सागर शेजवळ यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले.विनोद शिंदे याचा पाय व डोक्याला मार लागल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती पोलीसांनी घटना स्थळाची पाहणी करून खडीने भरलेला टॅम्पो पोलिस स्टेशनमध्ये लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!