मराठा बिझनेस नेटवर्कच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांचा सन्मान करण्यात आला


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मराठा बिझनेस नेटवर्क ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मराठा समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 6 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहांमध्ये भव्य असा फॅशन शो पार पडला. एमबीएन च्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा महिलांचा एमबीएन हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रंजना शेवाळे (दिव्यांग खेळाडू), स्मिता पटारे (समाजसेविका ), द्वारका नागवे (कृषी), मीना काळे( शिक्षिका), कांता जाधव (उद्योजिका), दुर्गा इनामदार डॉ. दीपांजली देशमुख (डॉक्टर), उमा भोसले (सरकारी वकील), शुभांगी देशमुख (पोलीस), कल्पना बारगळ (उद्योजिका ) यांना पुरस्कृत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अश्विनी बारहाते , वरिष्ठ लेखा परीक्षक शिक्षण साधना बांगर घारे , डॉक्टर पल्लवी लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. फॅशन शो साठी परीक्षक म्हणून कल्पना पवार आणि गौरी साळुंखे यांनी काम पाहिले. फॅशन शो साठी ज्येष्ठ महिला सुद्धा तरुणाईला लाजवेल या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. थीमनुसार प्रत्येकी तीन पारितोषिक देण्यात आले.


महाराष्ट्रीयन थिम-
प्रथम पारितोषिक आदिती वैभव
द्वितीय पारितोषिक ज्योती गणेश राऊत
तृतीय पारितोषिक शिवगंगा वाघमारे

साउथ इंडियन थीम : प्रथम पारितोषिक प्राजक्ता पाटील द्वितीय पारितोषिक कविता कान्हेरे तृतीय पारितोषिक पुष्पा मानकापे
वेस्टन थीम : प्रथम पारितोषिक कोमल सचिन पाटील द्वितीय पारितोषिक स्नेहल बावस्कर तृतीय सुरासे
याप्रमाणे विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम पारितोषिक पैठणी देण्यात आली. प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षिसांची लय लूट करण्यात आली . महिलांच्या उत्पन्नाला वाव मिळाला म्हणून वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते. या महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमबीएन अध्यक्ष अरुण पेरे तसेच संपूर्ण कोअर कमिटी मेंबर्स चे मार्गदर्शन लाभले.मराठा बिझनेस नेटवर्क महिला विंग अध्यक्ष किरण काळे यांनी प्रास्ताविक केले. (माहिती) महिला दिनाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष निलम खरात यांनी महिला दिना ची रूपरेषा थोडक्यात सांगितली सोनाली आतकरे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. जिज्ञासा पाटील व श्रुतिका गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. आणि कार्यक्रमाचे आभार स्मिता साळुंखे यांनी मानले. तसेच अर्चना कदम, हर्षाली देशमुख, जयश्री देगावे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पुनम घुले , योगिता साळुंके, योगिता यादव, यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!