समृद्धीवरील अपघात थांबता थांबेना अपघात दोन ठार; एक जखमी हर्सूल सावंगी परिसरातील समृद्धी महामार्गावर झाला अपघात

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) हर्सूल-सावंगी परिसरात समृद्धी महामार्गावर भरधाव कार समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला असून यात दोन ठार तर एक जण गंभीर जखमी आहे.
संदीप साखरवाडे (४०) आणि स्वरुप रामटेके (३५, दोघे रा. भैयाजीनगर, भंडारा), अशी मृतांची नावे आहेत. आशिष सरवदे (३७, भंडारा) हे गंभीर जमखी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालक रितेश भानादकर (२४) हा सुखरूप असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. भंडाऱ्यातील चौघे कारने क्रमांक एमएच ४३ एएल ८०२१ मुंबईला गेले होते. ८ मार्च रोजी ते माघारी भंडाऱ्याकडे निघाले. त्यांची कार समृद्धी महामार्गाने चॅनल क्र. ४३६ जवळ आली तेव्हा समोर लोडिंग ट्रक क्रमांक सीजी १५, डीबी ७१५८ जात होता. ट्रक त्याच्या लेनमधून धावत होता. घाटासारखा रस्ता असल्याने ट्रकची गती अवघी २५ ते ३० प्रती तास होती. त्या ट्रकवर पाठीमागून भरधाव कार धडकली. ट्रक चालकाच्या बाजुने कार धडकल्याने समोरून सीटवरील एक आणि पाठीमागील सीटवरील एक, असे दोघे ठार झाले. चालक आणि त्याच्या पाठीमागील सीटवरील दोघे जखमी आहेत. सुदैवाने चालकाला किरकोळ जखम झाली आहे. ही माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यावर उपनिरीक्षक मोहन चव्हाण, सहायक फौजदार मुंडे आणि अंमलदार बरडे हे तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी मदतकार्य करून कारमधील सर्वांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून घाटीत उपचारासाठी पाठविले. हर्सूल पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!