समृद्धी महामार्गावरील वैजापूर तालुक्यातील अगरसायगांव परीसरात भीषण अपघात, सैलानीच्या भाविकांवर काळाचा घाला. टेम्पो ट्रॅव्हरलची ट्रकला धडक, १२ ठार, २३ जखमी

वैजापूर (प्रतिनिधी)बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने छत्रपती संभाजीनगरमधील अगर सायगाव परीसरातील जांबरगाव टोल नाक्याजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली या धडकेत बारा ठार तर बाव्वीस जखमी झाले मृतात एका सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे

संभाजी नगर जिल्ह्यामध्ये आज सकाळी समृद्धी महामार्गावर खासगी टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रक दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाला असून वारंवार होणाऱ्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे
 रात्री 12.30 ते 12.45 वाजता संभाजीनगरच्या वैजापूरजवळील जांबरगांव टोलनाक्याजवळील आगर सायगाव येथे हा भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर एम पी ०९ एच एच ६४८३ क्रमांकाचा ट्रक थांबलेला होता. पाठीमागून आलेल्या भरधाव एम एच ०४ जी पी २२१२ खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील १२ प्रवाशी ठार झाले, तर २० ते २२ प्रवाशी जखमी झाले. जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात अत्यंत भीषण होता. अपघातामुळे टेम्पो ट्रॅव्हलरचा चक्काचूर झाला. इतकेच नव्हे तर गाडीमधील सीट, बसमधील प्रवाशांचे सामान, लहान मुलांची खेळणी सर्व काही रस्त्यावर येऊन पडले. सर्व काही अस्तव्यस्त झालं.

बारा प्रवाशी ठार
बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीला गेलेल्या नाशिक ईंदरानगर येथील भाविकांच्या बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. त्यावेळी समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन ही बस आदळली. या अपघातात १२ प्रवाशांसह एका बालकाचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच आधी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक गिरी पोलिस उपनिरीक्षक नागवे व पोलिसांनी मदतकार्य करत पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

जखमी प्रवाशांनी दावा केला आहे की पोलिसांनी ट्रकला थांबविला होता . पोलिस की आरटीओने ट्रक थांबवला

समृद्धी महामार्गावर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक थांबवला होता. त्यामुळे पाठीमागून आलेली खासगी बस ट्रकवर आदळल्याचं सांगितलं जातं. समृद्धी महामार्गावर कोणतंही वाहन अडवण्याची परवानगी नाही. असं असताना आरटीओच्या अधिकाऱ्यांनी ट्रक अडवून रस्त्याच्या कडेला थांबवला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा ट्रक अधिकाऱ्यांनी थांबवला नसता तर अपघात झालाच नसता असं सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!