महाकाय यंत्राने भेंडाळा फाट्यावरील दिशादर्शकची मोठी कमान पाडली कमानीखाली कार सापडली सुदैवाने लहान मुलगी बालंबाल बचावली अर्धा तास वाहतूक खोळंबली


गंगापूर (प्रतिनिधी )गंगापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे दिशादर्शक कमान पडून चार चाकीचे नुकसान.
शुक्रवार१२ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली .
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातहून गंगापूर मार्गे कर्नाटककडे कंटेनर जी जे ०१ सी व्ही ५५९९ महाकाय यंत्र घेवून जात होता भेंडाळा फाटा येथील गंगापूर मार्गावरील दिशादर्षक कमानीचा अंदाज न आल्याने कंटेनर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवुन कमानी खालून घातले मात्र कंटेनर मधील महाकाय यंत्राची उंची जास्त असल्यामुळे कंटेनर चे यंत्र कमानीला अडकून कमान खाली पडली दरम्यान छत्रपती संभाजीनगर हून गंगापूर कडे येणाऱ्या कार क्रमांक एम एच २० सी एस ८५२२ वर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी कार मध्ये लहान मुलीसह बसलेले प्रवासी बालबाल बचावले.
अपघाताची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाल्यावर गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, ट्रॅफिक हवालदार संदीप राठोड, श्रीकांत बर्डे, रमेश जारवाल यांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात पडलेली कमान बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!