मध्य रात्री घरात घुसून गजाने पतीपत्नीला मारहाण पतीचा डोळा निकामी पती गंभीर जखमी. घातपात की आणखी काही कारण याचा शिल्लेगांव पोलिसांचा तपास सुरू

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारात शेत वस्तीवर राहणाऱ्या  दाम्पत्याला अज्ञात चार मारेकऱ्यांनी दारुच्या नशेत गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे उलट सुलट चर्चेला उधाण.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील पोळ रांजणगाव शिवारात संतोष रोकडे पत्नी कविता रोकडे दाम्पत्य एका शेतात कामाला होते ११ ते  १२ एप्रिल गुरुवारी रोजी बारा ते साडेबारा वाजेदरम्यान  रोकडे दाम्पत्य गाढ झोपेत असताना अचानक अज्ञात चार जण दारु पिऊन वस्तिवर येवून घरात घुसून रोकडे दाम्पत्यस लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये संतोष रोकडे यांच्या डोक्यात व डोळ्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले तर पत्नी कविता किरकोळ जखमी झाली आरडाओरडा केल्यानंतर मारेकरी पसार झाले या घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख शेळके बिट जमादार धनंजय गोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून माहिती घेतली या प्रकरणी कविता रोकडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्या विरोधात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम ४५२,३२३,३२४,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिट जमादार धनंजय गोंडे करत आहे मारहाण करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.हा घातपात की आणखी काही काही कारण आहे याचा शोध पोलिस घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!