ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या ९ आरोपींवर विविध कलमान्वये अखेर गुन्हा दाखल

ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या ९ आरोपींवर विविध कलमान्वये अखेर गुन्हा दाखल
गंगापूर (प्रतिनिधी) शेतांच्या बांधावरुन दोन कुंटुबात तुफान मारामारीत ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणा-या ९ आरोपींवर विविध कलमान्वये अखेर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भागीनाथ नारायण वालतुरे वय 55 राहणार नेवरगाव याच शिवारात गट नंबर 418 मध्ये शेतीमधील बांधावर 28 मे रोजी दुपारी 3 वाजण्याचे सुमारास राहते घरी झोपुन असतांना शेता शेजारी राहणारे विलास पुंड यांनि फोन करुन सांगीतले तुमच्या शेतीचा बांध फुटलेले आहे. तुम्ही शेतात या असे म्हटल्याने, भागीनाथ वालतुरे मुलगा सौरभ वालतुरे हे मोटार सायकलवर शेतात गेले व शेतात कडेला थांबले तेंव्हा 1) शहादु एकनाथ हाडुळे 2) सुरेंद्र शहादु हाडुळे 3) जितेंद्र सहादु हाडुळे 4) महेश शहादु 5) ताराबाई 6) शारदा सुरेंद्र हाडुळे 7) सुनिता महेश हाडुळे 8) कांचन महेश व 9) शुभम सुरेंद्र हाडुळे या लोकानि भागीनाथ वालतुरे व मुलाला तुम्ही शेतीचे बांध का फोडले असे विचारले वरून वालतुरे यांनी सांगीतले कि, आम्ही शेतीचे बांध फोडले नाही, जर शेतीचे बांध फुटले असले तरि आपण चार लोक बोलवुन सदर प्रकरण सामंजस्याने सोडवु त्यावरून शहादु हाडुळे व त्यांचा मुलगा महेश यांनी मला सांगीतले की, आम्ही आता बांध फोडणार व महेश याने बांध फोडण्यासाठी त्यांचा ट्रक्टर लावला असता बांध फोडु नये म्हणुन दोघे ट्रक्टरच्या समोर उभे राहीलो. त्यानंतर वरिल लोकांनि वालतुरे व मुलगा सौरभ यांना खाली पाडुन, सुरेंद्र व शहादु हाडोळे यांनी लोखडी राॅडने मुलगा सौरभ वालतुरे याचे डोक्यात मारहान केली तसेच भागीनाथ यास शहादु हाडुळे, ताराबाई, महेश, शुभम यानि लोखंडी राॅडने व काठ्यांनी मारहान करून उजवे पाय फॅक्चर केले तसेच दोन्ही हाथ, उजवें खादे, कानाला चेह-यावर मारहान केली. तसेच महेशने ट्रॅक्टर चालु करून जिवे ठार मारण्याचे उददेशाने अंगावर घातले असता मागे सरकल्याने ट्रॅक्टर डाव्या पायावर गेल्याने पाय फॅक्चर झाले या भांडणाचा आवाज ऐकून पुतण्या सचिन वालतुरे तेथे आला. तसेच शेजारी राहणारे मिराबाई सुर्यवंशी, किरण सूर्यवंशी यानि फोन लावुन शुभम वालतुरे व पुतण्या योगेश वालतुरे यांना बोलावुन घेतले. मुलगा शुभम वालतुरे पुतणे योगेश वालतुरे व सचिन वालतुरे हे जखमींना दवाखान्यात घेउन जाण्यासाठी उचलित असताना हाडोळे यांनी त्याचे हातातिल लोखंडी राॅडने मुलाच्या डोक्यात मारहान केली. तसेच वरिल लोकांनी त्यास पकडुन ठेवले व महेशने ट्रॅक्टर चालवुन शुभमचे पायावरून घातल्याने शुभमचे उजवे पाय फॅक्चर झाला त्यानंतर जितेंद्र व सुरेंद्र यांनि लोखंडी राॅडने योगेश वालतुरे याचे डोक्यात मारहान केली तसेच 1) शहादु हाडुळे 2) सुरेंद्र हाडुळे 3) जितेंद्र हाडुळे 4) महेश हाडुळे 5) ताराबाई हाडुळे 6) शारदा हाडुळे 7) कांचन हाडुळे 8) शुभम हाडुळे 9) सुनिता हाडुळे यांनी आम्हाला शिवीगाळ करून पुतण्या सचिन वालतुरे यात लाथा बुक्क्यांनी मारहान करून तुम्हाला पुन्हा आमचे शेतात आलेवर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम ३०७,३२६,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी सपोनी शाईनाथ गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शकील शेख हे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!