माजी आमदार व माजी नगरसेवकांसह विस ते पंचवीस व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवतो का असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार कैलास पाटील यांच्या सह २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाच्या दिवशी 30 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 2.30 वाजे दरम्यान पांडुरंग लॉन्स,गंगापूर येथे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास बहिरु पाटील माजी सभापती ऋषीकेश कैलास पाटील माजी नगरसेवक योगेश पाटील ,रावसाहेब तोगे सर्व रा. गंगापूर ,राजु पठाण रा.अमळनेर ता.गंगापूर वइतर 20 ते 25 आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी सुनिल सर्जेराव पाखरे वय 32 वर्षे व्यव.-मजुरी रा.लासुर स्टे. ता.गंगापूर कैलास पाटील यांच्या पक्षाचे काम करीत होते ते गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी त्याच्या विरुध्द पॅनल मध्ये उमेदवार असल्याने या गोष्टीचा राग मनात धरुन फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली साक्षीदार अमोल जाधव यास लाकडी दांडयाने उजव्या पायावर मारुन करंगळी फॅक्चर केली तु आमच्या विरुध्द निवडणुकीला उभा राहिल्यास जिवंत मारुन टाकू, अशी धमकी दिली म्हणुन सुनील पाखरे यांच्या फिर्यादीवरून ४ एप्रिल रोजी गंगापुर पोलिस स्टेशनमध्ये वरील आरोपी विरोधात भादवी कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी सपोनी शाईनाथ गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनि अझर शेख, सहाय्यक फौजदार गणेश काथार हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!