देशातील लाखो भावी डॉक्टरांनी दिली नीट परीक्षा

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी निट परिक्षा सुरळीत पार
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी ७ एप्रिल रोजी सुरळीत पार पडली

07 मे 2023 रोजी NEET(UG)-2023 ची परीक्षा NTA च्या वतीने घेण्यात आली. यावर्षी NEET (UG)-2023 परीक्षेत तब्बल 18 लाख 72 हजार 341 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. देशभरातील 499 शहरामध्ये NEET (UG)-2023 परीक्षा घेण्यात आली. तसेच देशाबाहेरील 14 शहरामध्ये परीक्षा घेण्यात आली.

या परिक्षेसाठी शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ग्रामीण भागातील केंद्रांवर, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शहरातील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली.यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना जाण्या-येण्याचा प्रवास खर्च वाढला आहे. देशभरातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी महाराष्ट्रात सात लाख विद्यार्थी बसले असल्याने परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर विशेष खबरदारी घेतली आहे.परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर प्रवेश दिला. तसेच, विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली. सकाळी ११.३०पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या.

वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरित्या नीट परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे अखिल भारतीय स्तरावरील महत्वांच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. परीक्षेसाठी हॉल तिकीट एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते.१८० प्रश्‍नांसाठी ७२० गुण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतील प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट परीक्षा अनिवार्य असल्याने नीट परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते. दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या तीन विषयांवर एकूण १८० प्रश्‍न विचारण्यात आले. एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती जिल्ह्यातील या परिक्षेच्या आयोजकांनी दिली.
गंगापूर शहरातील माॅडर्न इंग्रजी शाळेत परिक्षा केंद्र देण्यात आले होते या परिक्षा केंद्रांतून ४८० भावी डॉक्टरांनी परीक्षा दिली या परिक्षा केंद्रांवर प्रभारी सपोनी शाईनाथ गिते, सपोनी अशोक चौरे, पोलिस उपनिरीक्षक अझर शेख, मेजर गुंजाळ ,पोहेका अमीत पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!