रोजगारहामी योजनेची कामे आठ दिवसांच्या आत सुरू न केल्यास पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकणार:-रवी चव्हाण

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम आठवड्यात सुरू न केल्यास जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकणार
गंगापूर (प्रतिनिधी)
गटविकास अधिकाऱ्यांच्या अडमुठपणाच्या धोरणामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सर्व कामे बंद पडलेली असुन, या आठवडयात ही कामे सुरु न झाल्यास संभाजीनगर जिल्हयातील सर्व पंचायत
समित्यांना टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा धामोरीचे ऊपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी निवेदनात देण्यात आला आहे
अपर मुख्य सचिव (रोहयो) नंदकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
गंगापूर तालुक्यासह संभाजीनगर जिल्हा व राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व कामावर गेल्या एक महिन्यापासून गटविकास अधिकारी यांनी बहिष्कार टाकल्याने सर्वच कामे बंद आहेत.तसेच, फेब्रुवारी महिन्यामध्ये तांत्रिक अधिकारी, एपीओ, संगणक चालक यांचा देखील एक महिना संप होता. आत्ता पुन्हा एकदा गटविकास अधिकारी यांनी गेल्या एक महिन्यापासून बहिष्कार टाकल्यामुळे मजुरासह लाभार्थी मेटाकुटीला
आहे. जर ही यंत्रणा अशाच प्रकारे गोरगरीब शेतकरी लाभार्थ्यांना भेटीस धरत असेल तर अशा लोकांना आता धडा शिकवावाच लागेल. तुमचे जर या सर्वांवर नियंत्रण नसेल, तर या सर्वांना ठिकाणावर आणण्याचे काम जनतेकडे द्या. बसून पगार घेत असताना गोरगरिबांची आर्थिक नुकसान करण्यात या अधिकारी कर्मचाऱ्यांना जर समाधान वाटत असेल, तर या गोरगरीब शेतकरी व लाभार्थ्यांसाठी जनतेला असंवेदनशील व निगरगठ्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात रूमन्ह घेऊन उभे रहावेच लागेल..प्रामुख्याने मजुराच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने ह्या योजनेअंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामे सुरू असतात.सद्यस्थितीत मग्रारोहयोचे सर्वाधिक कामे सुरू असून, यात वैयक्तिक सिंचन विहीर, घरकूल, जनावरांचा गोठा, महोगणी वृक्ष लागवड, सार्वजनिक विहीर यासह इतरही कामे पूर्णपणे बंद पडलेली आहेत. यामुळे मजुरांची देखील उपासमारी होत असून, कामे बंद असल्यामुळे कार्यरत अधिकारी एपीओ, तांत्रिक अधिकारी, संगणक चालक हे देखील सध्या बसून आहेत. सदरील कामे बंद असल्यामुळे याचा तोटा मजुरांसह ग्रामरोजगार सेवकांना देखील होत असुन, सध्या
स्थितीत हजारो कामे अर्धवट स्थितीत आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्ण झालेल्या कामांचा निधी पंचायत समिती स्तरावर आल्यानंतर तो निधी प्राप्त
करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी होणे आवश्यक असते. परंतु गटविकास अधिकाऱ्यांच्या
संपामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांचा निधी हा परत गेलेला आहे. यामुळे राज्यातील सर्व गट विकास
अधिकारी यांचा एक महिन्याचा पगार कापण्यात यावा, कारण एक महिन्यापासून या सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी शेतकरी व लाभार्थ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक व मानसिक नुकसान केलेले आहे.या सर्व बाबींचा लाभार्थ्यांना प्रचंड मोठा मानसिक व आर्थिक फटका बसल्यामुळे ग्रामस्तरावर सरपंचांना या सर्व
बाबींचा मोठा त्रास होत आहे. अगदी महिन्याभरावरावर पावसाळा येऊन ठेपला असल्याने, पाऊस पडल्यानंतर विहीर, रस्ते यासह इतर कामे केल्या जात नाही. यामुळे या वर्षात ही कामे अर्धवट स्थितीत पडण्याच्या मार्गावर असुन, याचा मोठा भुर्दंड लाभार्थी यांना सहन करावा लागणार आहे. एका बाजूने शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे आदेश दिले
जातात. परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेकदा ही कामे बंद पडतात.करीता सदर निवेदनाद्वारे आपणास सूचित करण्यात येते की, जर या आठवड्यात या गटविकास अधिकाऱ्यांचा संप मिटला नाही, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा धामोरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर चव्हाण यांची स्वाक्षरी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!