गंगापूर आगाराच्या चालत्या बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने ३५ ते ४० प्रवाशांना मिळाले जीवदान

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर आगाराच्या भंगार झालेल्या बसला अचानक आग लागली सुदैवाने फार मोठी जीवितहानी टळली चालकांच्या प्रसंगावधानामुळे ३५ ते ४० प्रवाशांचे प्राण वाचले.

गेले काही दिवस राज्यामध्ये अनेक ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाले. अशीच एक घटना देवगडफाटा येथे समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील गंगापूर आगाराच्या बस क्रमांक एम एच २० बि एल १२७६ ला नेवासा तालुक्यातील देवगड फाट्यावर पुणे जाणा-या या बसने ८ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता देवगड फाट्याजवळ बिघाड झाल्याने पेट घेतला होता अचानक आग लागल्याने बस पेटली असता बसचालक सुकदेव सोनवणे व वाहक एस एन एरगे यांनी प्रसंगावधान राखून आगविरोधी रसायन वापरुन आग विझवली यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विशेष म्हणजे चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या बसमधून प्रवास करत असलेल्या ३५ ते ४० प्रवाशांचे प्राण वाचले.
मागे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी देवगड फाट्याच्या पुढे असलेल्या टोल नाक्यावर एम एच २० डी ३६९० ही गंगापुर आगाराची बस जळुन खाक झाली होती बसचा व्हिल राॅड तुटल्याने बस पलटी होऊन आग लागली होती यामध्ये १५ ते २० प्रवाशांचा अक्षरषा कोळसा झाला होता सुदैवाने या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहुन पुण्याकडे जाणारी बस देवगड फाट्यावर आली. यावेळी बसने अचानक पेट घेतला. ही बाब चालक आणि कंडक्टरच्या लक्षात येताच त्यांनी कोणताही वेळ न दवडता प्रवाशांना खाली उतरवले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र,या आगीमध्ये बसचे मोठे नुकसान .

एसटी महामंडळाने जीर्ण झालेल्या बस भंगारात काढाव्यात. नव्या बस खरेदी करून प्रवाशांना चांगली सुविधा देणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. त्यांच्याशी विचारपूस केली असता घटना कशी घडली हे त्यांनासुद्धा कळले नसल्याचे प्रवाशांनी सांगितले ही बस गंगापूर आगाराची आहे.
बसची फिटनेस ट्रायल झाली होती का? झाली असेल तर बस पेटली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!